• Home
  • 🛑 महापौर किशोरी पेडणेकर यांचे कॉर्पोरेट कार्यालय….! SRA प्लँटमध्ये…? शिवसेनेची डोकेदुखी वाढणार 🛑

🛑 महापौर किशोरी पेडणेकर यांचे कॉर्पोरेट कार्यालय….! SRA प्लँटमध्ये…? शिवसेनेची डोकेदुखी वाढणार 🛑

🛑 महापौर किशोरी पेडणेकर यांचे कॉर्पोरेट कार्यालय….! SRA प्लँटमध्ये…? शिवसेनेची डोकेदुखी वाढणार 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :-⭕बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर भाजपने आता शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अनाधिकृत बांधकामे उघड करण्याचे काम सुरु केलंय. मुंबईतील वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीतील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. त्यामुळे आता शिवसेना पक्षाची डोकेदुखी वाढणार असल्याचे समजत आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एसआरएमधील फ्लॅट त्यांच्या कॉर्पोरेट कंपनीच्या नावाखाली घेतला आहे. किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडे दिलेल्या कागदपत्रात त्यांचा पत्ता आणि कॉर्पोरेट कंपनीचा पत्ताही एसआरएमधील इमारती इथला आहे.

याबाबत माझ्याकडे सगळी कागदपत्रे आहेत, त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी, असे मागणी करून आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय.

याअगोदर किरीट सोमय्या यांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या मुंबईमधील अनाधिकृत कार्यालयाला भेट दिलीय. म्हाडाची जागा अनिल परब यांनी बळकावून तिथे कार्यालय उभे केलंय. म्हाडाने याबाबत अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. एक 1 वर्षापूर्वी नोटीस देऊन देखील या कार्यालयावर कारवाई केलेली नाही, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता भाजपकडून आक्रमकपणे शिवसेना नेत्यांचे अनाधिकृत बांधकामांची पोलखोल करण्याची मालिका उघडली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरुय. मात्र, या प्रकारावरुन शिवसेनेची मात्र कोंडी होत आहे, असे दिसून येतंय….⭕

anews Banner

Leave A Comment