Home बीड गेवराई येथे जुगार अड्ड्यावर एसपींच्या पथकाचा छापा

गेवराई येथे जुगार अड्ड्यावर एसपींच्या पथकाचा छापा

116

आशाताई बच्छाव

IMG_20240120_073650.jpg

गेवराई येथे जुगार अड्ड्यावर एसपींच्या पथकाचा छापा

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/गेवराई दि:१९  येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक पथक प्रमुख सपोनि गणेश मुंडे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी गढी पुलाजवळील पत्राच्या शेडमध्ये धाड मारत चार जणांना ताब्यात घेतले आहे.या कारवाईत ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या पथकाच्या कारवाया जिल्हाभरात सुरू असतात. गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गढी उडान पुलाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सपोनि गणेश मुंडे यांना मिळाली होती. त्यानुसार येथे छापा मारून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी सुनील नारायण धोत्रे, प्रदीप बाजीराव मनोहर, प्रल्हाद बाबुराव देवकते सह मटका बुकी घेत असलेल्या राहुल खंडागळे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous article१६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही
Next articleराष्ट्रीय सेवा योजनेतून श्रमसंस्काराची बीजे पेरली जातात -हिरवे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.