Home बीड १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही

१६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_073337.jpg

१६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:१९  खाजगी कोचिंग क्लासेस करिता केंद्र शासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून त्यानुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना आता कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देता येणार नाही.खाजगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र शासनाने नवीन पावले उचलली आहेत.कोचिंग क्लासेस साठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत.१६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देता येणार नाही.रँक गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेस ना महागात पडणार आहे.तसेच आग प्रतिबंधक उपायोजना करणे सर्व क्लासेसना बंधनकारक असणार आहे.केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार कुणालाही खाजगी कोचिंग सेंटर उघडता येणार नाही.यासाठी सर्वात आधी नोंदणी करावी लागेल. त्याशिवाय १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देता येणार नाही.त्याशिवाय कोचिंग सेंटर चालवणारे विद्यार्थ्यांकडून आव्वाच्या सव्वा फीस वसूल करता येणार नाही.नियमावलीतील व्याख्येनुसार ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.नीट किंवा जेईई ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.त्याशिवाय खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये मनमानी फी आकारली जाते.त्यासाठी या सर्वांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार आयआयटी,जेईई,एमबीबीएस,नीट सारख्या प्रोफेशनल कोर्ससाठी कोचिंग सेंटरमध्ये आग प्रतिबंधक योजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्याशिवाय सुरक्षासंदर्भात एनओसी असणंही बंधनकारक करण्यात आलेय.परिक्षा आणि त्यांच्या निकालाच्या दबावाशी संबंधित समस्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आणि मानसिक आरोग्यशी धडे आणि पाठबळ द्यावे,असेही नियमात म्हटले.कोचिंग सेंटर्सने केंद्र वरच्या नियमानुसार नोंदणी करणं अनिवार्य आहे.त्याशिवाय सर्व नियमांचे पालनही करावे लागणार आहे.विद्यार्थ्यांना गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसला महागात पडणार आहे.कोचिंग क्लासेस नियम मोडल्यास आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे.कोचिंग सेंटर करून नियमांचे एकदा उल्लंघन झाल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.जर पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.त्यानंतरही नियम पाळले गेले नाहीत तर कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द होऊ शकते.नियमावलीतील व्याख्येनुसार ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.नव्या नियमानुसार एखाद्या कोर्सदरम्यान कोचिंग सेंटरला फीस वाढवता येणार नाही.जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला,तर उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील.हॉस्टेल आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल.दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना रक्कम माघारी करावी लागेल.शाळा,कॉलेज अथवा एखाद्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोणत्याही परिस्थितीत कोचिंग क्लासेस घेण्यात येणार नाहीत.त्याशिवाय एका दिवसात पाच तासांपेक्षा जास्त क्लास चालणार नाही.सकाळी लवकर आणि रात्री उशिरा क्लासेस घेता येणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.

Previous articleअमरावती येथील चपराशीपुरातील कुख्यात जुगारचालक रफुचक्कर !खेळणारे गजाआड,सीपीच्या विशेष पथकाची कारवाई.
Next articleगेवराई येथे जुगार अड्ड्यावर एसपींच्या पथकाचा छापा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here