• Home
  • बिहारीपुर येथे केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न [] माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची प्रमुख उपस्थिती []

बिहारीपुर येथे केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न [] माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची प्रमुख उपस्थिती []

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0050.jpg

बिहारीपुर येथे केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न

[] माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची प्रमुख उपस्थिती []

मुक्रमाबाद/ प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
कै. माणिकराव पाटील प्राथमिक शाळा बिहारीपुर येथे शुक्रवार (दि. ५) रोजी शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ मधील दुसरी केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न झाली आहे. यावेळी शिक्षणमहर्षी मा. शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. एन. वडजे, केंद्र प्रमुख मनोहर मुंगडे, जेष्ठ समाजसेवक सुभाषअप्पा बोधने, सुरेश सावकार पंदिलवार, तम्माअप्पा गंदिगुडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तसेच पारंपारिक शिक्षण पद्धती बदलून नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून, आजच्या शिक्षणात आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर केला पाहिजे. त्यामुळे शिक्षकांनी नवीन शिक्षण पद्धतीची आव्हाने पेलण्याची ताकद ठेवून, तशी इच्छाशक्ती आपल्या अंगी निर्माण केली झाली पाहिजे असे मत व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्या प्रवेश, ज्ञान रचनावाद, पायाभूत शिक्षण व अंकज्ञान, शिकू आनंदे आदी विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आदर्श पाठ नमुना अध्यपान संतोष बोधने सर यांनी केले तर सर्व शिक्षकांना निरीक्षण केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे वृक्ष रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष बालाजी पाटिल, बिहारीपुर चे सरपंच बालाजी जाधव, मुक्रमाबाद चे उपसरपंच सदाशिव बोयवार, बालाजीअप्पा पसरगे, बालाजी पाटील लाखमापूरकर, विषय तज्ञ डॉ. केरबा कांबळे, पवार सर, सय्यद सर, मदने सर, जाधव सर उपस्थित होते. तसेच कै. माणिकराव पाटील मु.अ. रावसाहेब दादाराव पाटील, कवडगावे प्रकाश,
बोधने संतोष, घोनशेट्टे नीलकंठ, पी. जि. पिनाटे, बी. डी. येरोले आदी शिक्षकांनी मेहनत घेतली. यावेळी सूत्र संचालन वाघमारे सर तर बोधने सर यांनी आभार मानले. केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व पालकांच्या उपस्थितीत ही केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न झाली.

anews Banner

Leave A Comment