• Home
  • 🛑 पुणे – नाशिक रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविले नाही तर….! टोल बंद आंदोलन 🛑

🛑 पुणे – नाशिक रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविले नाही तर….! टोल बंद आंदोलन 🛑

🛑 पुणे – नाशिक रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविले नाही तर….! टोल बंद आंदोलन 🛑
✍️ अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर :-⭕पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत.यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.हे खड्डे १५ दिवसांच्या आत बुजविण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस व संगमनेर तालुका एनएसयूआय यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. हिवरगाव पावसा येथील टोल कंपनी आयएलएफएस यांना हे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे कि,नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर कर्‍हे घाट ते बोटा खिंड परिसरात सतत पडत असणार्‍या पावसामुळे अनेक खड्डे पडले आहे.या महामार्गावर पडलेल्या खड्ड्याांत सध्या पावसाचे पाणी साचले जात आहे त्यामुळे वाहनचालकांना महामार्गावरील खड्डे चुकवताना तारे वरची कसरत करावी लागत आहे.

तसेच खड्डे चुकविण्याच्या नादामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कर्‍हे घाट ते बोटा खिंड परिसरातील खड्डे १५ दिवसा च्या आत दुरुस्त करावेत व रस्त्यांची चांगल्या प्रकारे डागडुजी करावी अन्यथा २५ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र रायाचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने टोल प्रशासनाला देण्यात आला आहे….⭕

anews Banner

Leave A Comment