Home भंडारा पहेला येथे संविधान रॅलीचे स्वागत

पहेला येथे संविधान रॅलीचे स्वागत

108
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_163131.jpg

पहेला येथे संविधान रॅलीचे स्वागत

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या नेतृत्वात, ईव्हीएम हटाव देश बचाव, संविधान बचाव, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, एससी ओबीसी एनटी,व्ही जेयेटी ,एसबीसी, यांना आरक्षण द्या. महागाई निर्देशांकानुसार शेतमालाला हमीभाव द्या. जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण रद्द करा. नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करा. इत्यादी मागण्यांना घेऊन खरबी येथून संविधान जनजागृती रॅली ची सुरुवात करण्यात आली.
सदर रॅली खरबी येथून सुरुवात होऊन पेट्रोल पंप, शहापूर, फुल मोगरा, बेला, भंडारा शिवाजी चौक, गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, अंबाडी सिल्ली मानेगाव गडाला व बोरगाव इत्यादी गावात जाहीर सभा घेण्यात आल्या. बोरगाव येथे बुद्ध विहारात संविधान जनजागरण रॅलीच्या कार्यकर्त्यांना भोजनदान देण्यात आले .आज दिनांक 20 फरवरी 2024 ला पहेला येथे सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे व त्यांच्या चमूने संविधान रॅलीचे स्वागत केले .
सदर रॅलीच्या नेतृत्व जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर, मुख्य संयोजक सदानंद ईलमे, निमंत्रक भैय्याजी लांबट कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, अचल मेश्राम, महासचिव शशिकांत भोयेर, डॉक्टर बाळकृष्ण सार्व, भाऊराव सार्व, कुंदा लुटे, आदिवासी नेते अजाबराव चिचामे, सुरेश खंगार ,इंजिनिअर रूपचंद रामटेके दिलीप ढगे, ज्ञानचंद जांभुळकर, रोशन उरकु डे, वामनराव गोंधळे, चंद्रशेखर खोब्रागडे, श्रीराम बोरकर, संजय लांजेवार ,मोरेश्वर तिजारे, मनोज देशमुख, मंजू गजभिये, गीतांजली घरडे, कुंदा उके, साहिल हुमणे ,रमेश शहरे, सूर्यकांत हूमने, व बहुसंख्य कार्यकर्ते रॅली सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे पहेला येथे संविधान रॅली यशस्वी करण्याकरता रितिक मेश्राम ,आदित्य मेश्राम, अभिषेक भांबोरे आयुष्य शेंडे, पियुष शेंडे विकास मेश्राम, राजेश मेश्राम रोशन मेश्राम ,विकी लोणारे, अंशुल तिरपुडे, यांनी व गावातील नागरिकांनी सहकार्य केले.

Previous articleअमरावती येथील पंचवटी चौकात स्वतःला ३५ वर्षे तरुणांना पेटवुन घेतले. उपचारासाठी नागपूर येथे रेफर; नागरिकांच्या सतर्कतेने प्राण वाचला.
Next articleआंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनविशेष —
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here