Home नांदेड “देगलूर महाविद्यालय देगलूर मध्ये तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन”.

“देगलूर महाविद्यालय देगलूर मध्ये तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन”.

89
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231019-210120_WhatsApp.jpg

“देगलूर महाविद्यालय देगलूर मध्ये तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन”.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

19 ऑक्टोबर 2023 आजच्या या सामाजिक माध्यमाच्या युगामध्ये समाज आणि विद्यार्थी वेगळ्या दिशेला जात आहे. त्यामुळे तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस कर्मचारी संजयजी पेंडपल्ले महाविद्यालय मध्ये आले होते.या मार्गदर्शनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आज जे काही सायबर गुन्हे घडत आहेत .या संबंधी मार्गदर्शन केले. त्यामध्ये मग बरेचसे विद्यार्थी हे सामाजिक माध्यमाच्या आहारी जाऊन आपले करिअर खराब करून घेत आहेत. त्यामध्ये मग रमी सारखा गेम असो किंवा गुन्हेगारी क्षेत्र असो आणि फेसबुक, युट्युब, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून फसवणुकीच्या सारख्या जाहिरातीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आत्महत्याग्रस्त परिस्थितीला कारणीभूत ठरत आहेत .व अनेकदा आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे आहेत. तसेच लैंगिक अत्याचाराचेही बळी पडलेले आहेत यासंबंधीचे सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले .या मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य प्रा .उत्तमकुमारजी कांबळे सर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणामध्ये कांबळे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या विचाराने मंत्रमुग्ध केले आजचा युवक हा देशासाठी, समाजासाठी, शिक्षणासाठी, आपल्या परिवारासाठी आणि आपल्या गुरुजनासाठी ध्येयाने प्रेरित झाला पाहिजे. तो सोशल मीडियापासून दूर राहिला पाहिजेत. त्या सोशल मीडियाचा त्यांनी फक्त आपल्या करिअरसाठीच उपयोग केला पाहिजे. असे अनमोल विचार त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक संग्राम पाटील, डॉ. धनराज लझडे प्रा. नागरगोजे ,प्रा. सूर्यवंशी, प्रा.हाके आणि इतर सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन प्रा. संतोष वानोळे सर तर आभार प्रा.डॉ. धनराज लझडे यांनी केले….

Previous articleदेगलूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साठे चौकातील रस्त्याचे काम खोळंबले विविध ठिकाणी मुतारी तुडुंब भरल्या.
Next articleसन उत्सवात एसटीतून’लक्झरी’प्रवास, ताफ्यात दाखल होणार नवीन स्लीपर कोच बस.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here