Home मुंबई एकट्या रोहितच्या वेतनात भागतो साऱ्या पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंचा पगार, वाचा सविस्तर

एकट्या रोहितच्या वेतनात भागतो साऱ्या पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंचा पगार, वाचा सविस्तर

112
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 एकट्या रोहितच्या वेतनात भागतो साऱ्या पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंचा पगार, वाचा सविस्तर 🛑
✍️ क्रिडा विश्व 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

क्रिडा-:⭕बीसीसीआय करारानुसार ‘अ+’ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाकाठी ७ कोटी रुपये, तर ए श्रेणीच्या खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळतात. बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे ३ कोटी आणि १ कोटी रुपये दिले जातात.

पाकिस्तानमध्ये तीन श्रेणीत करारबद्ध आहेत खेळाडू
ज्याप्रकारे बीसीसीआय आपल्या खेळाडूंना चार श्रेणीमध्ये करारबद्ध करते त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आपल्या खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये विभागले आहे. अ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाकाठी ११ लाख पाकिस्तानी रुपये (म्हणजे भारतीय रुपयात ५.२० लाख रुपये) दिले जातात. या श्रेणीमध्ये कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी व अझर अली यांचा समावेश होतो.

ब श्रेणीतील खेळाडूंना ७.५० लक्ष पाकिस्तानी रुपये तर, क श्रेणीतील खेळाडूंना ५.५० लक्ष पाकिस्तानी रुपये मिळतात. ब आणि क श्रेणीत अनुक्रमे ९ व ६ खेळाडू समाविष्ट आहेत.
जर पाकिस्तानी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या एकूण रकमेची भारतीय चलनात मोजदाद केल्यास ही रक्कम ७.४ कोटी इतकी भरते. याचाच अर्थ पाकिस्तानमधील सर्व खेळाडूंना मिळून एकट्या रोहित शर्मा, विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराह यांच्याइतके वेतन देण्यात येते.

भारतीय खेळाडूंचा वार्षिक करार

अ+ श्रेणी (७ कोटी)-
विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह

अ श्रेणी (५ कोटी)-
रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत व हार्दिक पंड्या

ब श्रेणी (३ कोटी)-
ऋद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर व मयंक अगरवाल

क श्रेणी (१ कोटी)-
कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुबमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल व मोहम्मद सिराज

सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये रोहितचे देखील नाव आहे. जाहिरातींच्या माध्यमातून होणारी त्याची कमाईही काहीशे कोटींमध्ये आढळते. सोबतच, बीसीसीआयकडून त्याला मिळणारे वार्षिक वेतन संपूर्ण पाकिस्तान संघाच्या वार्षिक वेतनाइतकेच आहे.

गुरुवारी (१५ एप्रिल) बीसीसीआयने ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी वार्षिक कराराची यादी जाहीर केली असून, यामध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह कर्णधार विराट कोहली ‘अ+’ श्रेणीमध्ये सामील आहे..⭕

Previous articleमहाराष्ट्राचा कॉमेडी स्टार भाऊ कदम घेतो ‘एवढे’ मानधन; रक्कम वाचून व्हाल चकित…🛑
Next articleयवतेश्वर घाटात उडी घेऊन साताऱ्यातील युवतीची आत्महत्या 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here