Home मुंबई महाराष्ट्राचा कॉमेडी स्टार भाऊ कदम घेतो ‘एवढे’ मानधन; रक्कम वाचून व्हाल चकित…🛑

महाराष्ट्राचा कॉमेडी स्टार भाऊ कदम घेतो ‘एवढे’ मानधन; रक्कम वाचून व्हाल चकित…🛑

161
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 महाराष्ट्राचा कॉमेडी स्टार भाऊ कदम घेतो ‘एवढे’ मानधन; रक्कम वाचून व्हाल चकित…🛑
✍️ मनोरंजन 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मनोरंजन :-⭕टीव्हीवर मराठीत कॉमेडीचा एखादा भन्नाट कार्यक्रम चालू आहे आणि त्यात भाऊ नाही, असे अजूनतरी दिसले नाही. आज भाऊचे चाहते सबंध महाराष्ट्रात आहेत. चाहते म्हणून भाऊवर प्रेम करणारी मंडळी सर्वच वयोगटाची आहेत.
कुटुंबाने दिलेली साथ आणि आपल्यातील कलागुणांच्या जोरावर आज भाऊ कदमने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर केले आहे.

मनात इच्छा असल्यास तुम्हाला काहीही आडवे येत नाही. कदाचित भाऊ कदम हा शेवटचा मराठी कॉमेडी सुपरस्टार ठरू शकतो, असे चित्रपट क्षेत्रातील जाणकार मंडळी म्हणत असतात. कारण कॉमेडी करणे हे खूपच अवघड काम आहे आणि आता त्यात काही मंडळी ‘स्टार’ होऊ शकतात पण ‘सुपरस्टार’ नाही.

गरिबीत वाढलेल्या भाऊ कदमला लागलेला नाटकांचा नाद त्याला आज थेट पडद्यावर घेऊन आला. मात्र त्यासाठी लागणारा संयम भाऊकडे होता. त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची त्याची तयारी होती.

आज ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाऊ आपल्या सर्वांना भेटतच असतो. भाऊ अनेक कार्यक्रमाच्या सुपाऱ्याही घेतो. अनेक वर्ष मोठा संघर्ष केलेला भाऊ आजही जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा आहे. एकेकाळी एका कार्यक्रमाला जायला मिळावे म्हणून भाऊच्या बायकोने आपले कानातले गहाण टाकले होते. मात्र आज हाच भाऊ बायकोला पाहिजे ते दागिने विकत घेऊन देऊ शकतो, इतके पैसे कमावतो आहे.

भाऊचा संघर्ष हा खूप मोठा आहे. ज्यांना त्याचा संघर्ष माहिती आहे, ते आजही भाऊला सलाम करतात.

प्रामाणिक आणि लोकांमध्ये सहज मिसळणारा भाऊ कदम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या एका एपिसोड साठी तब्बल 80 हजार रुपये घेतात. आपल्याला मात्र आज हे 80 हजार रुपये भाऊसाठी सहज वाटतील.

मात्र एकेकाळी अवघ्या 100 रुपयांसाठी भाऊने आणि त्याच्या कुटुंबाने खूप मोठा त्याग, संघर्ष केलेला आहे. ⭕

Previous articleकोरोनाच्या ७ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
Next articleएकट्या रोहितच्या वेतनात भागतो साऱ्या पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंचा पगार, वाचा सविस्तर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here