Home पश्चिम महाराष्ट्र यवतेश्वर घाटात उडी घेऊन साताऱ्यातील युवतीची आत्महत्या 🛑

यवतेश्वर घाटात उडी घेऊन साताऱ्यातील युवतीची आत्महत्या 🛑

103
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 यवतेश्वर घाटात उडी घेऊन साताऱ्यातील युवतीची आत्महत्या 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕मृतदेह सुमारे 50 फूट खाली अडचणीच्या ठिकाणी असल्याने ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले. सुमारे एका तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

यवतेश्वर घाटात कड्यावरुन उडी घेऊन साताऱ्यातील 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली. पोलिसांना घटनास्थळी मुलीचे आधार कार्ड सापडल्याने ओळख पटली आहे.

तो मृतदेह बेपत्ता युवतीचा
घटनास्थळी पोलिसांना आधार कार्ड मिळाल्याने त्या मुलीचे नाव स्पष्ट झाले. बेपत्ता दाखल बाबत माहिती घेत तिच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली. शहर पोलीस ठाण्यात एक युवती बेपत्ता झाल्याची नोंद आहे. दरीत सापडलेला मृतदेह त्या बेपत्ता मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

दरम्यान, कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आक्रोश केला. पोलिसांना मुलीची डायरी सापडल्यानंतर त्याची माहिती घेतली असता त्यामध्ये शेरोशायरीसह 1 एप्रिलपासून दैनंदिनी लिहिलेली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून नैराश्यातून हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ⭕

Previous articleएकट्या रोहितच्या वेतनात भागतो साऱ्या पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंचा पगार, वाचा सविस्तर
Next article🛑 नाशिक शहरात सुसज्ज असे कोविड सेंटर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here