Home नांदेड मुखेड नपा प्रशासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा पर्यावरण पुरक श्री...

मुखेड नपा प्रशासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा पर्यावरण पुरक श्री स्थापनास बक्षीस मिळणार

149
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0001.jpg

मुखेड नपा प्रशासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा

पर्यावरण पुरक श्री स्थापनास बक्षीस मिळणार
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड –

माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत मुखेड नगर परिषद प्रशासनाच्या वतीने ईको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३१ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक व घरगुती पर्यावरण पुरक गणपती स्थापन करणाऱ्या भाविकांना नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सर्व स्पर्धकास प्रशस्तीपत्र व प्रथम, द्वितीय, तृतीय स्वरुपात नगद पारितोषिक देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यास्पर्धेत सहभागी होण्याचे अवाहन उपविभागीय अधिकारी तथा नपा प्रशासक आय.ए.एस. सौम्या शर्मा, मुख्याधिकारी धनंजय थोरात यांनी केले.
पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी व जनतेत नैसर्गिक पर्यावरण पुरक शाडुची मुर्ती व मातीची मुर्ती आदी वस्तुंचा वापर वाढावा यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने मुखेड नगर परिषद प्रशासनाच्या वतीने ईको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सजावटीत कोणत्याही अविघटनशील थर्माकोल, पीओपी, प्लास्टिक सजावटीचे साहित्य इत्यादी साहित्यांचा समावेश नसावा. पर्यावरण संवर्धन, स्वच्छते बाबतचे टाकाऊ वस्तूंचे पुनर्वापर व सामाजिक संदेश इत्यादी विषयांवर आधारित सजावटीला प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येईल तसेच जागेवर तयार होणाऱ्या निर्माल्याचे प्रक्रिया करणाऱ्या मंडळास प्राधान्य दिले जाणार आहे. सार्वजनिक व घरगुती स्पर्धकांना आॅनलाईन व आॅफलाईन स्पर्धेत भाग घेता येणार असून श्री गणेशांचे विसर्जन पर्यावरण पुरक करणे आवश्यक असून उत्सवाच्या दरम्यान निर्माण होणारे निर्माल्य कुठल्याही जलस्त्रोतात न टाकता नगर परिषदेच्या निर्माल्य कक्ष वाहनात टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे नियम व अटी पाहण्यासाठी शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आल्या आहेत.
ईको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेत श्रीभाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन मुख्याधिकारी धनंजय थोरात, स्वच्छता विभागाचे अभियंता सागर पडोळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here