• Home
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.)व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.)व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210126-WA0131.jpg

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.)व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
मनोज बिरादार मुखेड तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.) व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे शाळेचे मुख्याध्यापक सौ श्रीरामे मॅडम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. येथे राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीरामे मॅडम यांच्या हस्ते व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन कोतावाड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामसेवक श्री डुमणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. उंद्री (प .दे.) येथील तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पाटील वडजे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले.व प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून देताना विविधतेत एकता व मूलभूत हक्क व अधिकार आणि एकात्मता या सर्व बाबींचा आपल्या जीवनात योग्यतेपणे उपयोग करून सुसंस्कृत ,समृद्धपणे जीवनमान उंचवावे व भारताची एकात्मता अविरतपणे चालू ठेवावी ,भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही . या वेळी व्यसनमुक्ती गाव परिसर शाळा यांची शपथ सर्व गावकऱ्यांना समोर घेण्यात आली. यानंतर भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक सौ. श्रीरामे मॅडम व सर्व शिक्षक ,शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव तुकाराम पाटील वडजे ,शिक्षण समिती अध्यक्ष हनमंत पाटील वडजे, ग्रामपंचायत ऑपरेटर राजेंद्र आडबलबार , ग्रामसेवक डुमणे सर , पंप ऑपरेटर नियाजअहमद शेख , सेवक हिरामण सोनकांबळे ,अनिल पाटील वडजे, आकाश पाटील वडजे, भास्कर पाटील सूर्यवंशी, शिवाजी पंदनवाड ,शंकर गुरुजी पंदनवाड, दयानंद सोनकांबळे, संजय सोनकांबळे, व पत्रकार बालाजी पाटील शिंदे ,पत्रकार मनोज पाटील बिरादार, पत्रकार राजेंद्र अडबलवार ,आकाश पाटील वडजे ,प्रकाश राठोड, मगदूम शेख ,नागोराव वादे ,रज्जाकसाब शेख, गावातील प्रतिष्ठित नागरिक व नवतरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment