Home नाशिक नांदगावला संत शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी!

नांदगावला संत शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी!

144

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0034.jpg

नांदगाव प्रतिनिधी, अनिल धामणे नांदगांव :        येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदीरा श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नाभिक समाज नांदगाव तालुका अध्यक्ष विजय निकम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कुणीही कुठल्याही प्रकारचे व्यसन लावुंन घेऊ नका. व्यसनामुळे आपल्या शरीराचे नुकसानच होते. विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण दिले जाते पर्यायाने आपण आपल्या आपल्या परिवारास, समाजाला दुःखाच्या खाईत लोटत असतो त्यामुळे व्यसन करत असाल तर आजपासून त्यांनी सोडून द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमास तालुका सचिव सतिष बिडवे, निलेश बिडवे, दिपक झुंजारराव, नरेंद्र निकम, राजेंद्र निकम, महेश सोनवणे, लक्ष्मीकांत निकम, निलेश निकम,बाऴासाहेब निकम, रविन्द्र बिडवे,शरद बिडवे, संकेत बिडवे,विजय गायकवाड़ रामदास गायकवाड़ निलेश बनकर मनोज तूपे, देवीदास निकम, श्रावणा निकम, विशाल निकम, सर्व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Previous articleकविता:बैलपोळा
Next articleअतिवृष्टी सर्वे यादीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे समाविष्ट करा! अन्यथा जास्तगाव येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.