Home सामाजिक कविता:बैलपोळा

कविता:बैलपोळा

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0080.jpg

कविता:बैलपोळा

बैलपोळा सण हा गावचा
शेतकऱ्यांच्या आनंदाचे रूप
पुरणपोळीचा घास ओठी
गोडधोड खातो खूप

कृतज्ञता व्यक्त करतो
आम्ही आमच्या बैलाची
बैल आमचा सफर करतो
आयुष्यभर लाखो मैलाची

बैलांच्या कष्टानेच शेतकरी करतो
नांगरणी असो अथवा पेरणी
म्हणूनच नतमस्तक होतो
शेतकरी दादा बैलांच्या चरणी

अंघोळ घालून बैलांची
त्यावर चढवतो आम्ही झूल
पुरणपोळी करण्यासाठी
आई मांडते अंगणात चूल

मुक्या प्राण्यांनाही जीव असतो
हीच भावना मनोमनी बसते
पोळा म्हणजे गाव खेड्यात
जणू जत्राच बैलांची असते

बैलपोळा सण म्हणजे
आमच्या आनंदाची भरती
शब्दात मांडतो मी आज
आमच्या संस्कृतीची कीर्ती

©® गणेश रामदास निकम
चाळीसगाव गणेशपूर
मो.न७०५७९०४६७७
९८३४३६१३६४
२६/८/२०२२

Previous articleतोणदे नामसप्ताहात डॉ . दिलीप नागवेकर कुटुंबीयांकडून बेल रोपांचे मोफत वाटप
Next articleनांदगावला संत शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here