Home रत्नागिरी तोणदे नामसप्ताहात डॉ . दिलीप नागवेकर कुटुंबीयांकडून बेल रोपांचे मोफत वाटप

तोणदे नामसप्ताहात डॉ . दिलीप नागवेकर कुटुंबीयांकडून बेल रोपांचे मोफत वाटप

174

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0033.jpg

तोणदे नामसप्ताहात डॉ . दिलीप नागवेकर कुटुंबीयांकडून बेल रोपांचे मोफत वाटप

रत्नागिरी,(सुनिल धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : तोणदे सांब मंदिरात गेली ६७ वर्षे सांब देवस्थानाचा हरीनाम सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी हा सप्ताह दि. १५ ऑगस्ट रोजी सुरु होऊन २२ ऑगस्ट समाप्त झाला. त्याचे औचित्य साधून हातिसचे डॉ. दिलीप नागवेकर कुटुंबीयानी भाविकाना एकूण ५० बेलाचे रोपांचे वाटप केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

भाविकानी त्याचे पावित्र्य राखून लागवड करणार असल्याचे नमूद केले. त्यावेळी सौ. दिपिका नागवेकर, श्री. जयवंत नागवेकर, श्री. सुदर्शन आणि सौ. अवंतिका नागवेकर, श्री. नंदकुमार आणि सौ. पूजा सुर्वे, श्री. कुंदन आणि सचिन तसेच सौ. शिल्पा, सौ. श्वेता, कु. सोनल, जिज्ञासा, कु. दिप सुर्वे यांचे हस्ते भाविकाना या रोपांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी तोणदे गावचे सरपंच श्री. सचिन भोवड, देवस्थानचे पदाधिकारी श्री. राजू पेटकर ( सचिव ), श्री. सुर्यकांत तोडणकर, श्री. देवेंद्र भाटकर, श्री. महेश भाटकर, श्री. किरण, श्री. चंद्रशेखर ( बंटी ) महाकाळ, श्री. संतोष चव्हाण, श्री. प्रकाश गुरव ( तंटा मुक्ती अध्यक्ष ), ग्रामस्थ श्री. पर्शुराम महाकाळ, श्री. राजन भाटकर आणि श्री. मधुकर भाटकर हे उपस्थित होते . तसेच ग्राम विकास मंडळ, हातिसचे माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र नागवेकर, ग्रामस्थ महेश नागवेकर, श्री. सुयोग विलणकर हे उपस्थित होते.

Previous articleरिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारीणी निवडणुकीत सोलापूरचे राजाभाऊ सरवदे यांची राज्य अध्यक्ष पदी निवड
Next articleकविता:बैलपोळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.