Home माझं गाव माझं गा-हाणं ग्रामीण भागातील कार्यरत डाॅक्टरांचा ‘कोव्हिड योध्दा’ सन्मान कार्यक्रम संपन्न

ग्रामीण भागातील कार्यरत डाॅक्टरांचा ‘कोव्हिड योध्दा’ सन्मान कार्यक्रम संपन्न

177
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामीण भागातील कार्यरत डाॅक्टरांचा ‘कोव्हिड योध्दा’ सन्मान कार्यक्रम संपन्न                             मालेगांव,(श्रीमती आशाताई बच्छाव युवा मराठा न्युज नेटवर्क)

श्री छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती नवी दिल्ली, शाखा – महाराष्ट्र राज्य

स्वामिन फाउंडेशन, नाशिक
यांचे संयुक्त विद्यमानाने डॉक्टर-डे निमित्ताने मालेगांव तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दोन वर्षापासून अविरीत पणे उत्कृष्ट आरोग्यसेवा देणारे डॉक्टरांचा कोविड योद्धा म्हणून हॉटेल सेवन इन, मालेगांव -सटाणा रोड, मालेगांव येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.तुषार दादा शेवाळे,
कार्यक्रमास प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून
उपविभागीय अधिकारी मा. विजयानंद शर्मा,
मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक डॉ. जयंत दादा पवार,
श्री छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे समन्वयक डॉ. संदीप पवार दिल्ली,
डॉ. अनिल पाटील धुळे,
प्रा.प्रशांत गावंडे,
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक तथा तालुका आरोग्य अधिकारी मालेगांव डॉ. शैलेशकुमार निकम,
तालुका आरोग्य अधिकारी देवळा डॉ. सुभाष मांडगे,
स्वामिन फाउंडेशन नाशिक चे अध्यक्ष डॉ. सागर पाटील व
सचिव डॉ.भूषण वाणी आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
श्री छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र चे राज्याध्यक्ष श्री.अनिकेत विजय पाटील यांचे प्रेरणेने  औषध आपल्यादारी हा उपक्रम राबवून आयुर्वेद मार्गदर्शक वैद्य अपश्चिम बरंठ यांचे सदर कार्यक्रमास आयुर्वेदिक वनस्पती व त्याचे मानवी जीवनास उपयुक्तता व रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी अनमोल मार्गदर्शन लाभले.
कोरोना काळात मालेगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील १४१ गावांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचा विशेष कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. याच प्रसंगी औषधी वनस्पतीचे ही वाटप करण्यात आले.
यावेळी
मा. उपविभागीय अधिकारी श्री. विजयानंद शर्मा यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करून कार्यक्षेत्रात करण्यात आलेले रूग्ण व संशयितांचे योग्य ट्रेसिंग, गावा-गावात करण्यात आलेले कोव्हिड तपासणी RT-PCR / RAT टेस्टिंग, रूग्णांवर वेळेवर औषधोपचार, लसिकरण याकरिता सर्व विभागांची साथ घेत मालेगाव तालुक्यातील संपूर्ण आरोग्य विभागाने उत्कृष्ट काम केलेबद्दल अभिनंदन केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक व आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. जयंत दादा पवार यांनी मागील वर्षातील कोरोना परिस्थितील पहिल्या लाटेच्या कालावधीत परिस्थिति खुप वाईट असतांना सर्व शासकीय यंत्रणा यांचे योगदाना मुळेच कोरोनावर नियंत्रण करून आटोक्यात आल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. तुषार दादा शेवाळे यांनी कोरोना-१९ च्या प्रादुर्भाव व तालुक्यातील आरोग्य विभागाने घेतलेल्या विशेष परिश्रमामुळेच मालेगांव चे चांगले नावलौकिक झाले, त्यात आरोग्य विभागातील सर्वच घटकांचे योगदान असून या सर्व यंत्रणांचे आभारी असल्याचे व्यक्त केले.
मालेगाव ग्रामीण भागात आजपर्यंत ६३,००० पेक्षा जास्त लाभार्थींना कोव्हिड लसिकरण पूर्ण केलेबद्दल अभिनंदन केले.
याच कार्यक्षम पद्धतीने संभाव्य पुढील लाटेसाठी लढण्यासाठी पुन्हा तयार राहावे अशी सुचना केली.
डॉ. शैलेशकुमार निकम यांनी ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी यांचे सन्माना बद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती व स्वामिन फाउँडेशन या दोहो समितीचे अन विशेष करून माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. विजय नवल पाटील यांचे आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ संघटना (मँग्मो) माजी राज्याध्यक्ष कै. डॉ प्रकाश आहेर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक श्री. अमोल निकम यांनी केले.
आभार श्री. नंदकिशोर कासार ( तालुका लेखापाल ) यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. विजय पवार तालुका वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक,
श्री. निमेश वसावे वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक,
श्री. राजू घ्यार कुष्ठरोग पर्यवेक्षक,
श्री. महेश काटे समुहसंघटक,
श्री. जितेंद्र पाटील कनिष्ठ सहाय्यक ,
श्री. भटू शिंदे तालुका आरोग्य सहाय्यक,
श्री. देवीदास हिरे डाटा ऑपरेटर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here