Home मुंबई ‘शेअर मार्केट किंग’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे निधन

‘शेअर मार्केट किंग’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे निधन

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0033.jpg

‘शेअर मार्केट किंग’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे निधन

मुंबई (अंकुश पवार जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल अँड पेपर)

भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे.
वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
१९८५ साली भारतीय शेअर बाजारामध्ये त्यांनी केवळ पाच हजारांची गुंतवणूक करत आपली कारकिर्द सुरू केली होती. त्यांनी नुकतीच ‘अकासा’ ही एअरलाईन सुरू केली होती.
१९९० वर्षी हर्षद मेहता प्रकरण गाजत असताना राकेश झुनझुनवाला यांनी खूप मोठे प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली आणि शेअर मार्केट मध्ये आपली ‘शेअर मार्केट किंग व भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख निर्माण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here