Home महाराष्ट्र संपादकीय अग्रलेख..

संपादकीय अग्रलेख..

112
0

*संपादकीय अग्रलेख..*
*सत्याच्या वाटेवरील पत्रकारितेची अखंड वाटचाल* *गेले ते कावळे,सोबत आहेतच मावळे!* वाचकहो, “युवा मराठा”वृतपत्रांची मुहुर्तमेढ रोवतानांच आम्ही एक पक्का निश्चय व निर्धार केला होता की,बहुजन समाजातल्या तळागाळातील बारा बलुतेदार,अठरा पगड जातीधर्माला सोबत घेऊनच हि प्रबोधनाची लढाई व्यशस्वी करीत गेलो,त्यात बरेपैकी यशदेखील लाभले.हे सर्व करीत असताना आम्ही कधी जातीभेद मानला नाही.”जे जे आपणांशी ठावे ते इतरांशी सांगावे,शहाणे करुन सोडावे सकळ जन या संत वचनाप्रमाणे आम्ही या शब्दप्रवासात आणि अत्याधुनिक आँनलाईन न्युज पोर्टलच्या प्रवासात कार्यरत राहिलो आहोत.पत्रकारिता करतांना आम्ही एक ध्येय व उद्देश मनामध्ये नेहमीच बाळगला होता की,अगदी तळागाळातल्या सामान्यांतला सामान्य माणूस यालादेखील पत्रकारितेचे शिक्षण देऊन घडवायचे व तसा प्रामाणिकपणे प्रयत्न देखील आम्ही केला.मात्र लोकांचे जोडे उचलण्यातच आमचा जमाना गेला.आमची लायकी नसताना सुध्दा दुसऱ्यानांच लायकी मिळवून देण्यासाठी अक्षरशः नालायकी केली.मात्र गाढवाच्या अंगावर वाघाचे कातडे पांघरल्याने ते डरकाळी फोडत नसते हे तरी महामुर्खाना कधी कळणार?युवा मराठा या आमच्या पोटच्या मुलाप्रमाणे असलेल्या अपत्यरुपी वृतपत्राचा आणि न्युज चँनलचा जन्म हा तुमच्या सर्वाच्या साक्षीनेच दोन हजार तीन सालात झाला.या आमच्या अपत्यानेच आम्हांला जगणे शिकविले.मान -सन्मान मिळवून दिला.इतकेच काय तर पोट भरण्याचे सुध्दा शिकविले.मात्र शिरजोर बनून मुजोर झालेल्या आणि आम्हीच मातवलेल्या काही हितशत्रुनी आणि भस्मासुरानी युवा मराठाचे नेहमीच खंडन करण्याचा प्रयत्न केला आणि करीतच आहेत.मात्र आम्हांला आपल्या सारख्या सुजाण मायबाप वाचक,दर्शक वर्गाची साथ लाभली तर अशक्य असे काहीच नाही.युवा मराठाने नेहमीच उपेक्षित गोरगरीबांची साथ संगतच पुरविली.अन्यायाचा तिरस्कार ,भ्रष्टाचारावर प्रहार आणि लबाड खोट्या भामटयांवर लेखनीचा घणाघाती वार केला म्हणून युवा मराठा सर्वसामान्यांचा जिव्हाळा बनून राहिला.मात्र काही आमच्याचा बिरादरीतल्या नासलेल्या किडयांनी युवा मराठाची प्रतिमा मलीन करण्याचा सध्या सपाटा चालविला आहे.त्यामुळे भयानक अशा संकटाना सामोरे जाऊन आज पुन्हा तुमच्यासामोर आम्ही निर्भिडपणे उभे आहोत.सत्याच्या वाटेवर चालत असताना हा मिळत असलेला अनुभव आम्हांला खुप काही शिकवून गेला.वै-याची दुश्मनी पावन करण्याची इथल्या संस्कृतीची रित आहे. दुश्मनांची बद्दुवा आम्हांला हमेशा प्रिय आहे.आमच्या जीवनात आम्ही कधी कोणाला दुःख दिले नाही,किंवा कोणाचे वाईटही केले नाही.सतत प्रत्येक जातीधर्माच्या दुःखीताला जवळ करुन त्याचा आधार होण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.नारी जातीचा आम्ही आदरच करीत आलो आहोत,कारण आम्ही देखील एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतला आहे हे कधीच विसरत नाही.तरीही आमच्याच काही हितचिंतक म्हणवणा-या गद्दारांनी आमच्या सुखी जीवनात मतभेद निर्माण करत आम्हांला आयुष्यातून उठविण्याचे षडयंत्र रचले आहे.पण त्यांचे हे मनसुबे कधीच व्यशस्वी होणार नाहीत.कारण पाप करुन गुन्हे करुन जर का कोणी मोक्ष मिळविण्याची स्वप्ने पाहत असेल तर ते या जन्मी तरी अशक्यच आहे.कारण पापाला माप नसते शेवटी हेच खरे?सभ्यतेचा बुरखा पांघरलेल्यांनी पांढरी कपडे घालून केलेले काळे धंदे,बडयांनी बोललेलं धडधडीत असत्य व खोटे या दुनियेत आजकाल कौतुकास पात्र ठरते आहे.असत्येचेच्या मार्गावर चालणारे तव्यावर नोटा शेकत आहेत.लुच्चाईच्या या जमान्यात सच्चाईला खुलेआम लाथाळले जात आहे.आक्रस्थळी,तथा उरबडवी भाषा आम्हांला मंजूर नाही,आपुलकी,स्नेह,जिव्हाळा ,प्रेम या शिदोरीवरच आमची वाटचाल सुरु आहे.आम्ही माणस जोडली,अनेकांना पत्रकारितेच्या संसारात बसविले.कोणाची चहाडी मात्र केली नाही.ज्यांना ज्यांना आमचे समजून चांगले मार्गदर्शन केले अखेर हितचिंतकांच्या नावाला काळीमा लावणाऱ्या या भामट्यांनी काय साध्य केले? जीवन क्षणभंगूर असले तरी बेवकुफ,लबाड,बदमाशांच्या भलत्या सलत्या गोष्टींनी आम्ही हार मानायला आजही तयार नाहीत.कारण कोंबड कितीही मेल्याहून मेलेलं असलं म्हणून ते ओरडणं थोडचं थांबवत?मेलेलं कोंबड कधी आगीला घाबरत?याची जाणीव आमच्याच हितचिंतक,हितशत्रुनी ठेवायला हवी.कारण केलेले पाप येथेच भरावे लागते हे तरी कसे नाकारायचे?त्याशिवाय पितृपक्षात फक्त कावळ्यांची आठवण होते नाही तरी ते कधी इतरत्र उडून जातील त्याचाही काही भरवसा नाही.परंतु युवा मराठाने मार्गदर्शन करुन घडविलेले पत्रकाररुपी मावळे आजही सोबतच आहेत.व राहतील शिवाय कावळे कधी घरात पाळण्याची पक्षी प्रेमासारखी गोष्ट नाही.की कावळ्यांना पोपटासारखे शिकवून हुशार करता येईल.शेवटी कावळा तो कावळाच कुणाच्या पिंडाला शिवला तर त्याला एक दिवसापुरता भाग्यवान समजतात.एरवी हाच कावळा वर्षवर्ष गायब असतो अशा या भामटया हितचिंतकाचा बुरखा पांघरलेल्या कावळ्यापासून युवा मराठाने कुठली ती अपेक्षा बाळगायची?कारण युवा मराठाने नेहमीच एकटे नाहीत तुम्ही ,सोबत आहोत आम्ही सर्वाच्या सोबत सर्वासाठी;प्रत्येक व्यक्ती आणि घरासाठी हे स्विकारलेले वचन कधीच विसरणार नाही.एवढेच!

Previous article
Next articleचिंताजनक ” नांदेड कोरोना शतक पार, मंगळवारी दिवसभरात ९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here