Home गडचिरोली रिपब्लिकन पक्ष फक्त राजकीय पक्ष नाही ते जन आंदोलन आहे– बाळासाहेब खोब्रागडे

रिपब्लिकन पक्ष फक्त राजकीय पक्ष नाही ते जन आंदोलन आहे– बाळासाहेब खोब्रागडे

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0063.jpg

रिपब्लिकन पक्ष फक्त राजकीय पक्ष नाही ते जन आंदोलन आहे– बाळासाहेब खोब्रागडे

गडचिरोली येथे रिपब्लिकन जन चेतना अभियान संपन्न

गडचिरोली, (जिल्हा प्रतिनिधी सुरज गुंडमवार ) रिपब्लिकन पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नाही. हे समाजातील गरीब आणि वंचित वर्गासाठी काम करणारे जनआंदोलन आहे. ही चळवळ अधिक बळकट होण्याची आवश्यकता असून ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी केले.
ते बुधवारी येथील प्रेस क्लब येथे पक्षाच्या रिपब्लिकन जनचेतना अभियानानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.कुलपती मेश्राम हे होते तर केंद्रीय उपाध्यक्ष श्री.अशोक निमगडे, रोहिदास राऊत, केंद्रीय सदस्य राजूभाऊ खोब्रागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रि. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशराव सम्रुतवार, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सुरेखा बारसागडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी रिपब्लिकन जनचेतना अभियानाचा एक भाग म्हणून फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत इंदिरा चौक ते प्रेस क्लबपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
श्री.खोब्रागडे पुढे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाने मागासलेल्या व उपेक्षित लोकांसाठी संघर्ष केला आहे. निवडणुकीच्या राजकारणातही अनेक दिग्गज नेत्यांनी चळवळीसाठी बलिदान दिल्याचा गौरवशाली इतिहास आहे. पक्षाचे कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. निमगडे म्हणाले की, सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व टिकून राहणे गरजेचे आहे कारण राजकीय सत्तेसोबतच सामाजिक परिवर्तनासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा एकमेव पक्ष आहे जो वंचित वर्गाचा खरा आवाज बनू शकतो. सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून रिपब्लिकन पक्ष या समस्या सरकारसमोर मांडत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात श्री.कुलपती मेश्राम यांनी रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख लोकांचा पक्ष असा केला आणि पक्षाचे गतवैभव परत मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. या पक्षाकडे अजूनही मुख्य प्रवाहाचा राजकीय पक्ष बनण्याची क्षमता आणि सामर्थ्य आहे, असे ते म्हणाले.
यावेळी गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, शहराध्यक्ष अनिल बारसागडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीता सहारे, सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, वनमाला झाडे आदी उपस्थित होते.
हंसराज उंदिरवाडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य राजन बोरकर यांनी तर आभार तैलेश बांबोडे यांनी मानले. रॅली यशस्वीतेसाठी कृष्णा चौधरी, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, हेमचंद्र सहारे, प्रल्हाद रायपुरे, साईनाथ गोडबोले, विजय देवतळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleमनविसेच्या भोटा ते कालवड पर्यंत रस्ता दुरुस्तीसाठीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित
Next articleवाशिम जिल्हा सह मालेगाव तालुक्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here