Home उतर महाराष्ट्र एकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठीची लायब्ररी सुरू…

एकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठीची लायब्ररी सुरू…

19
0

Yuva maratha news

1000313816.jpg

एकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठीची लायब्ररी सुरू…                                                  श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी 

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील तरुण व तरुणींना स्पर्धा परीक्षासाठी यशोधन जनसंपर्क कार्यालयात अद्यावत लायब्ररी सुरू करण्यात आली असून या लायब्ररीचा शुभारंभ लोकनेते आमदार #बाळासाहेब_थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. डॉ. वृषाली साबळे, श्रीराम कुऱ्हे, सुरभी मोरे, सुरभी असोपा व आदि उपस्थित होते.

यशोधन कार्यालयात या लायब्ररीचा स्वतंत्र कक्ष असून सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 5 या वेळेत विद्यार्थ्यांना आपल्या आय कार्ड वर पुस्तके मिळणार आहेत. एकविरा च्या वतीने सुरू झालेल्या ग्रंथालयात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, एमपीएससी, युपीएससी, नेट, सेट, बँकिंग भरती, मेडिकल, इंजीनियरिंग सीईटी, नीट यांसह विविध परीक्षांसाठीचे पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

Previous articleकोपरगावात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न
Next articleआंबेडकर जयंतीनिमित्त दिपक कदम यांना पुरस्काराने सन्मानित…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here