Home सोलापूर पंढरपूर परिसरात चार्जिंग स्टेशन सुरू करावीत- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची महावितरणकडे मागणी

पंढरपूर परिसरात चार्जिंग स्टेशन सुरू करावीत- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची महावितरणकडे मागणी

157

आशाताई बच्छाव

IMG_20240226_081145.jpg

पंढरपूर परिसरात चार्जिंग स्टेशन सुरू करावीत- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची महावितरणकडे मागणी

सोलापूर जिल्हा ब्युरो चीफ ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

महावितरणने पंढरपूर परिसरात ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू करावीत अशी मागणी कार्यकारी अभियंता,पंढरपूर यांचेकडे सक्षम भेटुन केली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. सध्या सर्व प्रकारच्या वाहन निर्मितीत इलेक्ट्रीक वाहने मोठया प्रमाणात वापर केला जात आहे. इंधनाचे वाढते भाव व प्रदूषण रोखण्यासाठी भविष्यात त्याचा वापर वाढणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथेही देशाच्या विविध भागातून येणाऱ्या ई- वाहनांची संख्या मोठी असल्याने परिसरात चार्जिंग सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आलेल्या भाविकांना अडचणीचे होत आहे. त्यासाठी पंढरपूर परिसरात चार्जिंग स्टेशन सुरू होण्याची आवश्यकता आहे.यासाठी महावितरण विभागाने पंढरपूर शहर परिसरात १) कार्यकारी अभियंता कार्यालय परिसर,लिंक रोड २) सागोला रोड, सब स्टेशन (पारेषण कार्यालय परिसरात) ३) भडीशेगाव सब स्टेशन ४) पद्मावती स्टेशन परिसर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करावीत व ग्राहकांना आपली वेगळी सेवा उपलब्ध करून घावीयाची प्राधान्याने कार्यवाही करण्याची मागणी अधिक्षक अभियंता,सोलापूर यांच्याकडे अ.भा. ग्राहक पंचायतीचे प्राप्त सदस्य सुभाष सरदेशमुख, प्रांत कोषाध्यक्ष जिल्हा सचिव सुहास निकते , पांडुरंग अल्लापूरकर यांनी केली आहे.

Previous articleशतकवीर रक्तदाता सुरेश रेवणकर यांचे रक्तदानाच महान कार्य ऐकून अनेकांनी केले रक्तदान
Next articleप्राचार्य सी डी रोटे कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणार–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.