Home नाशिक प्राचार्य सी डी रोटे कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणार–

प्राचार्य सी डी रोटे कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणार–

155
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_201331.jpg

प्राचार्य सी डी रोटे कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणार–

कुसुमाग्रज नगरी शिरवाडे वणी येथे २७ रोजी पुरस्कार वितरण

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर सदस्य असलेल्या अध्यात्मिक विठ्ठल रखुमाई ग्रुपचे जेष्ठ सदस्य तसेच राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर व राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप सारख्या ३५१ हुन अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदर्श प्राचार्य सी डी रोटे यांना कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती नासिक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सलादे सर वडनेर भैरव यांनी दिली आहे.
विविध क्रीडा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक प्रशासनातील पारदर्शक कारभाराबरोबरच विविध कला, क्रीडा, सामाजिक सांस्कृतिक व राष्ट्रीय देशहिताच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व बौद्धिक विकासासाठी राबवत असलेल्या आखीव रेखीव नियोजनबद्ध उपक्रम ही निश्चितच अभिमानास्पद असून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल प्राचार्य सी डी रोटे यांची कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्राचार्य सी डी रोटे यांना 27 फेब्रुवारी 2024 रोजी कुसुमाग्रज नगरी शिरवाडे वणी हॉटेल दौलत फुटबॉल तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव हा मानाचा व सन्मानाचा पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते करण्यात येणार आहे. अद्याप पावितो प्राचार्य सी डी रोटे यांना छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श क्रीडा शिक्षक, आदर्श मार्गदर्शक, आदर्श पंच ,आदर्श प्राचार्य, लोकमान्य टिळक, आदर्श प्रशासक आदी ३५१ अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी केंद्रीय मंत्री, जेष्ठ साहित्यिक, जेष्ठ विचारवंत, मा मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, आमदार आदी प्रमुख व्यक्तींच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
प्राचार्य रोटे यांना कविवर्य कुसुमाग्रज जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष रामभाऊ आवारे सर, विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच मुख्य मार्गदर्शक रामायणाचार्य ह भ प भास्कर नाना रसाळ आहेरगाव, ह भ प विठोबा दादा आवारे शिरवाडे, भागवताचार्य सौ शुभदा ताई लोहार सांगली,रामायणाचार्य हभप सौ मिनाताई मडके शेवगाव, ह भ प विनायक महाराज वाघ धामोरी, विठ्ठल रखुमाई ग्रुपचे मुख्य संचालक भागवत कथाकार ह भ प शंकरराव कोल्हे नैताळे, भागवताचार्य‌‌‌ हभप सिमाताई राजेंद्र काळे चांदवड,सौ कांताताई इंगळे जाधव घाटकोपर, ज्येष्ठ सदस्य साहेबराव अण्णा कुयटे आहेरगाव, भास्कर आबा मांजरे धामोरी, लक्ष्मण आवारे सर चांदवड, अशोकराव पगार सर मनमाड, एन पी गवळी सर विंचूर, बाबुराव पाटील सानप शिवडी, नवनाथ माऊली बोरगुडे ,शंकरराव भवर, अरुण भाऊ घायाळ नैताळे, अरुण भाऊ कातकाडे, सौ वैशालीताई दौंड शिवडी, सौ संगीता पाटील ,सौ सुनिता जगताप, सौ रेखा येणारे ,श्रीमती सुरेखा धुमाळ,सौ सुवर्णा निकम, सौ ज्योती मावरे, सुनिता बागोरे, संतोष चव्हाण मनमाड, सौ रिनाताई सोनवणे, सौ रमाताई आठवले, सौ मंगल सासवडे, सौ जयश्री चव्हाण,सौ वैशाली डुंबरे ,सौ पल्लवी जाधव,सौ दीपा शिंदे वनसगाव, सौ जयाताई निचीत सोनेवाडी आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleपंढरपूर परिसरात चार्जिंग स्टेशन सुरू करावीत- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची महावितरणकडे मागणी
Next articleबीड जिल्ह्यातील बस व इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here