Home वाशिम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वाशीम मार्फत झालेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ भरती मध्ये झालेल्या...

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वाशीम मार्फत झालेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ भरती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत न्याय मिळावा

468
0

राजेंद्र पाटील राऊत

देवेंद्र कलकोट
वाशीम तालुका प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वाशीम मार्फत झालेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ भरती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत न्याय मिळावा

वशिम् – राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरती करिता फेब्रुवारी 2022 मध्ये जाहिरात प्रगट करून अर्ज मागविण्यात आले होते त्यासाठी अर्ज प्राप्त झाली अर्जाची छाननी झाली त्रुटी ची यादी प्रसिद्ध करून त्रुटी दूर करून पुन्हा एकवीस (21) अर्जदारांची ज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध केली आणि 10 मार्च रोजी मुलाखात करिता बोलवण्यात आले या भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा घेण्याची कुठेही नमूद नव्हते परंतु अचानक आठ (8) तारखेला सर्व अर्जदारांना आपापले व्हाट्सअप नंबर मागून ग्रुप तयार केला आणि त्यांचा ग्रुप तयार करून आठ (8) तारखेला काढलेली लेखी परीक्षेचे पत्र ग्रुप वर टाकले आणि आता लेखी परीक्षा होणार असे सांगितले आता तक्रार करत्या यांनी
1) सदर परीक्षा कोणत्या मंडळाने आयोजित केली ?
2) पेपर कोनी सेट केला ?
3) पेपर कुठे आणि कोणत्या कार्यालयात लॉकर मध्ये होता ?
4) हा पेपर फुटला असेल का ?
5) दिलेले जाहिराती प्रमाणे एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 1:3 किंवा 1:5 याप्रमाणे निवड करण्यात येणार होती , मात्र जेष्ठता यादी नुसार 11 क्रमांकाचा हितसंबंधाच्या उमेदवार निवडण्याकरीता वेळेवर पेपर घेण्याचे आयोजन केले गेले आणि पात्र उमेदवारांना डावलण्यात आले असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे त्याचे कारण असे की जेव्हा लेखी पेपर वेळेवर आयोजित केला आणि त्याची उमेदवार निवड करताना किती गुण ग्राह्य धरली की पूर्ण भरतीचा पाया लेखी परीक्षा होता कारण 11 नंबर वर ज्येष्ठतेनुसार असलेल्या उमेदवार
निवडला जातो म्हटल्यावर हे वरिल् प्रश्न उपस्थित होणे सहाजिक आहे शैक्षणिक पात्रता आणि कोव्हिड अनुभव डावलुन उमेदवार निवडला तरी त्या उमेदवाराची निवड त्वरित स्थगिती करून चौकशी करावी व आम्हास न्याय द्यावा ही विनंती तक्रार करते , अश्विनी हरिहर ठाकरे ,अश्विनी सुखदेव टेकाळे , शीला तुकाराम गुडदे, जय बबनराव देवरे ,सुरेश उत्तमराव आकोटकर ,अंकिता उद्धव काळे , अमोल पंढरी काळे ,मारुती उत्तम वाबळे , यांनी प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय वशिम, चक्रधर भाऊ गोटे , सभापती आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम , व जिल्हा आरोग्य अधिकारी वाशीम यांना निवेदन दिले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here