Home उतर महाराष्ट्र कोपरगावात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न

कोपरगावात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न

18
0

Yuva maratha news

1000313809.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –सहकार महर्षी, माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रेरणेने युवानेते मा. श्री. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठाण आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाहसोहळा २०२४ कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय मैदान येथे अत्यंत उत्साहात, मंगलमय वातावरणात व पंचक्रोशीतील साधू संतमहंत, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभ आशिर्वादाने आदर्शवत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा शंकरराव कोल्हे, कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, श्री. दत्तूनाना कोल्हे, श्री. अमितदादा नितीनराव कोल्हे, श्री. प्रणवदादा पवार, श्री. ईशानभैय्या बिपीनदादा कोल्हे, सौ. मनालीताई अमितदादा कोल्हे, सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे, सौ. श्रद्धाताई ईशानभैय्या कोल्हे आदीसह अध्यात्मिक, सामाजिक राजकीय उद्योग अश्या विविध क्षेत्रीतील मान्यवर, नागरिक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनाशिकरोडला हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा
Next articleएकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठीची लायब्ररी सुरू…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here