Home नांदेड मुखेड शहर सुंदर व स्वच्छ शहर आता बनतय.

मुखेड शहर सुंदर व स्वच्छ शहर आता बनतय.

47
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220519-WA0033.jpg

मुखेड शहर सुंदर व स्वच्छ शहर आता बनतय.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड शहर सुंदर व स्वच्छ रहावे  यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आंबेडकरी चळवळीचे नेते दशरथराव  लोहबंदे व त्यांच्या परिवाराने  पुढाकार घेऊन  पानभोशी येथील एका संस्थेच्या माध्यमातून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे काम हाती घेतले असून मुखेड शहरातील नाल्या कचरा रस्ता साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे त्यामुळे मुखेड शहर सुंदर व स्वच्छ दिसत आहे या या कामी दररोज सत्तर गोरगरीबांच्या हाताला काम मिळत आहे.
मुखेड नगर परिषद ने गत  पाच वर्षापासून हिमायतनगर येथील एका माजी नगराध्यक्ष यांंच्या संस्थेला शहराच्या साफसफाईचे काम दिले होते दर महिना 14 लाख रुपये शहराच्या साफसफाई साठी नगरपरिषद प्रशासन खर्च करीत होते यातील पन्नास टक्के यंत्रणा नगरपालिकेची होती तरीही सदरील साफसफाई  टेंडर मिळालेल्या  या संस्थेने थातुरमातुर साफ सफाईचे काम करून दर महिना 14 लाख रुपयांची देयके नगरपालिका प्रशासनाने या संस्थेवर खर्ची करत होते तरीही शहरात घाणीचे साम्राज्य पसरले होते अनेक नागरिकांनी व नगरसेवकांनी घाणीच्या साम्राज्यात च्या तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नागरिकांना शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते दरम्यान हिमायतनगर येथील संस्थेचे कालावधी संपताच शहरातील आंबेडकरी चळवळीचे नेते मा.जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे  यांच्या परिवाराने शहरातील साफसफाई चा विडा उचलुन ना नफा व तोटा या तत्वावर पानभोशी  येथील एका संस्थेच्या माध्यमातून शहरातील स्वच्छतेचे काम हाती घेऊन मुखेड शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा उचलला असून शहरातील मुख्य रस्ते, गल्ली बोळातील नाली, रस्ते, आणि घन कचरा उचलण्याचे काम हाती घेतले असून पावसाळ्यात रोगराई पसरू नये व नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्नशील असून शहरात  कांंही दिवसा पूर्वी दिसत असलेले कचर्याचे  ढिगारे, तुंंबलेल्या नाल्या, काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून याकडे स्वतः आंबेडकरी चळवळीचे नेते दहशरथराव  लोहबंदे   हे लक्ष घातल्याने  शहर सुंदर व स्वच्छ दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here