Home नांदेड ४ दिवसांपासून विज पुरवठा खंडित झाल्याने केरूर येथील नागरिकांचे बेहाल..

४ दिवसांपासून विज पुरवठा खंडित झाल्याने केरूर येथील नागरिकांचे बेहाल..

61
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220517-WA0020.jpg

४ दिवसांपासून विज पुरवठा खंडित झाल्याने केरूर येथील नागरिकांचे बेहाल..

▶️विजपुरवठा खंडीत झाल्याने जनजिवन विस्कळीत गावात तिव्र पाणीटंचाईने महिला, बालक, वयोवृद्ध, नागरिकांना कडक उन्हाळात भटकंती

▶️ विज वितरण कंपनिचे कर्मचारी नाॅट रिचेबल …
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथील मागील ४ विजपुरवठा खंडीत झाल्याने गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी ३ किलोमीटर भटकंती करून पाण्याच्या शोधात आपले गुरे – ढोरे घेऊन जाऊन आपली तहान भागवावी लागत आहे.

गावातील विजपुरवठा खंडीत झाल्याने गावातील महिला, बालक, वयोवृद्ध नागरिकांना आपले सर्व कामे सोडुन पाण्यात शोधात भटकंती करावी लागते यामुळे गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे भर उन्हाळ्यात नागरिकांना रात्र जागुण काढावी लागत आहे.

या गंभीर प्रश्नांकडे विद्युत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन केरुर येथील विजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा अन्यथा अशी मागणी केरूर येथील ग्रा.प सदस्य सतिष पा. शिंदे, गिरीधर पा. शिंदे, हाणमंतराव पा.शिंदे, शिवाजी पा. शिंदे, जयशींग डुमणे,नरसींग पांचाळ, भाऊसाहेब पा.शिंद, गोविंद पा.शिंदे, केरबा पा.शिंदे, शंकर पा.शिंदे, बालाजी पा.शिंदे,यशवंत पा.नरवाडे यांच्या सह गावातील नागरिकांनी केली आहे.

Previous articleमुखेड शहर सुंदर व स्वच्छ शहर आता बनतय.
Next articleआम आदमी पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी नागनाथ पाटील पाळेकर तर सचिवपदी नामदेव बोमनवाड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here