Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील वाळू घाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना.

अमरावती जिल्ह्यातील वाळू घाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना.

97
0

आशाताई बच्छाव

IMG-20230520-WA0028.jpg

अमरावती जिल्ह्यातील वाळू घाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
ब्यूरो चिफ रिपोर्टर.
अमरावती.
अवैद्य वाळूच्या तस्करीला लगाम लावण्यासाठी; तसेच वाळू माफिया पासून सर्वसामान्यांची सुटका व्हावी, याकरिता राज्य शासनाने नवीन वाळू धरणाची घोषणा केली. महिना भरापूर्वी शासनाने या धोरणाला मान्यता दिली. आता दीड ते दोन महिने होवुनही प्रत्यक्षात आणि स्तरावर नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणी अडथळे येत आहे. सध्या बांधकामाचा हंगामा सुरू असून, दर दिवशी शहर व जिल्हा सुमारे १२०० ब्रास वाळू येत आहे. जिल्ह्यातील वाळू घाट सुरू असल्यानंतर सुमारे ४००० ब्रासने सर्वसामान्यांना मिळू शकले असते; मात्र जिल्ह्यातील वाळू घाट अजूनही बंद असल्यामुळे शेजाऱच्या मध्य प्रदेशातून येत असल्याने वाळूसाठी ७००० रुपये ब्रास प्रमाणे पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे दर दिवशी वाळू खरेदी करणारे बांधकाम व्यवसाय, नागरिकांना सुमारे ३६ लाख रुपयाची अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शासकीय वाळूघाट अद्याप सुरू झाले ना नसल्याने सर्वसामान्यांना नवीन वाळू धरणानुसार प्रतिब्रास ६०० रुपयांना मिळणारी वाळू दिवा स्वप्न ठरत आहे. अशात वर्षभरापासून वाळू घाट बंद असल्याने कोट्यावधी रुपयाचे महसूल बुडाला आहे. तसेच निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. राज्य शासनाच्या नवीन वाळू धरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा खनिजकर्म विभागाने जिल्ह्याभरातील ४४ वाळू घाटामधून वाळू उपसा करणे व डेपोपर्यंत वाळूची वाहतूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. विशेष म्हणजे सलग तीन वेळा निविदा मागितल्या नंतरही ४४ पैकी केवळ ११ ठिकाणीच निविदा आल्या. मात्र या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ही प्रक्रिया सुद्धा तूर्तास थांबली चला बंद होणार आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी वाळू १० जून ते३० सप्टेंबर पर्यंत बंद राहतो. त्यामुळे शासनाच्या नवीन वाळू धरणानुसार सर्वसामान्यांना ६०० रुपये प्रति ब्रास मिळणारा वाळू आता किमान ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत तरी मिळू शकणार नाही. परिणामी सहा ते ७००० रुपयांनी वाळू खरेदी करावी लागणार आहे. अमरावती जिल्ह्यात ४४ वाळू घाट असून जिल्ह्यातील ८ तालुक्यात ४४ शासकीय वाळू घाट आहे. यामध्ये जावरा फतेपुर, ईसापूर, नमस्कारी, चांदूर ढोरे, भारवाडी(तिवसा), गणोजा देवी, दाढी, चाकूर, कानफोडी, नांदेड खु., भोजपुरी, नायगाव, दिघी महल्ले, गोकुळ सरा भाग १व२ बोरगाव निस्ताने (धामणगाव रेल्वे) निंभार्णी, शिवरा भाग१ते३(मोर्शी) नांदेड बु., खानापूर चिपर्डा, जहानपूर, वडुरा, करखेडा, लासुर, रामतीर्थ, चांडोळ (दर्यापूर), हिवरा पूर्णा, एल्की पूर्ण, सावळापूर, खानापूर, वडगाव खु., येसूर्णा, निंबारी, सावळी बु.,(अचलपूर), तळनी पूर्ण, खापरखेडा पूर्ण (चांदूरबाजार) सोना बर्डी, रत्नापूर, मोखा, चीच घाट (चिखलदरा) ४४पैकी ३३ घाटाकरिता तीनदा निविदा मागितल्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता याबाबत काय निर्णय घ्यायचा या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय घेऊ असे इमरान शेख जिल्हा खानीकर्म अधिकारी यांनी सांगितले.

Previous articleमिस्ड कॉल द्या….! मुख्यमंत्री सहायता निधी माहिती मोबाईल वर मिळवा
Next articleनाफेडणे हरभरा खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचा दाणा-दाणा त्वरित खरेदी करावा.:- अक्षय पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here