Home बुलढाणा नाफेडणे हरभरा खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचा दाणा-दाणा त्वरित खरेदी करावा.:- अक्षय...

नाफेडणे हरभरा खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचा दाणा-दाणा त्वरित खरेदी करावा.:- अक्षय पाटील

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0026.jpg

नाफेडणे हरभरा खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचा दाणा-दाणा त्वरित खरेदी करावा.:- अक्षय पाटील
स्वप्निल देशमुख ब्यूरो चीफ बुलढाणा
जळगाव जा. :- यावर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचा पेरा बऱ्यापैकी केला होता. परंतु आताचे खाजगी बाजारपेठेतील हरभऱ्याचे बाजार भाव ४३००/४५०० पर्यंतचे आहेत. नाफेडच्या बाजारभावात व खाजगी बाजार भावात ८००/१००० रुपयाचा फरक असल्यामुळे हा भाव परवडणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी अंदाजे (६०००) शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदी केलेल्या आहेत.

त्यामध्ये जे नाफेड खरेदी केंद्र चालू आहे त्या खरेदी केंद्रावर दररोज ५५० क्विंटलचे टार्गेट आहे. त्यामुळे ही खरेदी अतिशय थंड गतीने चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त तालुक्यातील १ हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाल्याचे दिसून येते.

उर्वरित बाकी शेतकऱ्यांनी हरभरा कधी विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्याचे दिसून येते त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण तयार झालेले आहे.

एवढ्या थंड गतीने हरभरा खरेदी चालू राहिल्यास शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे नोंदणी केलेल्या उर्वरित हजारो शेतकऱ्यांच्या मालाचा विचार करुन तालुक्यामध्ये नवीन हरभरा खरेदी केंद्र चालू करून प्रत्येक खरेदी केंद्राचे खरेदीचे टार्गेट वाढवावे.

कारण काही दिवसांमध्येच शेतकऱ्याच्या पेरणीला सुरुवात होणार आहे.

तरी शासनाने पर्यायी व्यवस्था करून द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता येईल. कारण प्रश्न हा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे.

ही मागणी घेऊन आज उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद येथे युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी लावून धरली.

यावेळी तुकाराम गटमने, रामभाऊ रोटे, अश्पाक देशमुख, अजय गिरी, गौतम तायडे, स्वप्निल बोरसे, महादेव गटमने, अविनाश पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील वाळू घाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना.
Next articleदैनिक युवा मराठा चे रामभाऊ आवारे यांना गोदा युवा सामाजिक पुरस्कार जाहीर–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here