Home नाशिक टाकळी विंचूर विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

टाकळी विंचूर विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

113
0

आशाताई बच्छाव

IMG-20230926-WA0070.jpg

टाकळी विंचूर विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

न्यू इंग्लिश स्कूल टाकळी विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे लेझीम पथक बँड पथक ग्रंथदिंडी झांज पथक वारकरी दिंडी झाशीची राणी महा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेशभूषा धारण करून बेटी बचाव बेटी पढाव स्त्री भृण हत्या याचे फलक घोषणा देत गावातून भव्य दिव्य गावातून मिरवणूक काढली व तसेच डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती निमित्त विद्यालयात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आले
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संतोष शेठ पलोड, डॉ सुजित गुंजाळ, आर के चांदे लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा, देवढे एन.ई.प्राचार्य क.भा पा विद्यालय विंचूर, तेलोरे जी एन प्राचार्य रुई, दरेकर के बी पर्यवेक्षक वनसगांव, किशोर शेठ केंगे स्कुल कमिटी अध्यक्ष, वामनराव जेऊघाले ,राजाराम शिंदे, शमशुदींन काद्री, सुखदेव राजोळे ,वसंत शिंदे ,धनंजय काळे ,विलास काळे, पो. पाटील, अश्विनी ताई जाधव सरपंच, शिवा आप्पा सुराशे ,ज्ञानेश्वर मोकाटे, भीमराज पवार, वाळू अण्णा पवार ,अनिल शेठ जाधव ,सुनील कवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मुर्दुळ निळे यांच्याकडून यांच्याकडून तसेच कै दामोदर शिवनाथ अहिरे देवा गुरुजी यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दामोदर अहिरे उपशिक्षक तसेच बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जगताप अनिल नामदेव यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व दहावीत प्रथम येणारे विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक देण्यात आली. सदर प्रसंगी प्रमूख वक्ते महेंद्र गायकवाड सर यांनी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकला. विद्यालयात कर्मवीर जयंती निमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लभडे एस डी यांनी योग्य ते मार्गदर्शन केले .त्या प्रसंगी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आहिरे जे.डी यांनी काम पाहिलं. सूत्रसंचालन मुदगुल एस एस यांनी केले. कनोज एन व्ही ,आहिरे पी टी, कदम एन आर, वळवी आर के, खैरनार एस एस.यांनी परिश्रम घेतले.

Previous articleम वि प्र संचलित नांदुर्डी विद्यालयात मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
Next articleदेगलूर येथिल गणेशोत्सवानिमित्त निघणार्या मिरवणूक मार्गावर खड्डे बुजविण्यास सुरुवात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here