Home नाशिक दैनिक युवा मराठा चे रामभाऊ आवारे यांना गोदा युवा सामाजिक पुरस्कार जाहीर–

दैनिक युवा मराठा चे रामभाऊ आवारे यांना गोदा युवा सामाजिक पुरस्कार जाहीर–

154
0

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0028.jpg

दैनिक युवा मराठा चे रामभाऊ आवारे यांना गोदा युवा सामाजिक पुरस्कार जाहीर–

पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची घेतली संस्थेने दखल–

दैनिक युवा मराठा
निफाड (रामभाऊ आवारे)

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा दैनिक युवा मराठा निफाड विशेष प्रतिनिधी रामभाऊ विठ्ठलराव आवारे (वनसगाव) यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने गोदा युवा सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा धनगर समाजाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब ओहळ यांनी दिली आहे.
पत्रकार रामभाऊ आवारे दोन दशकांपेक्षा ही अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून विविध दैनिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळविला असून अद्याप पावतो त्यांना २६० पेक्षाही अधिक जागतिक, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराने विविध मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले आहे. विठ्ठल रखुमाई आध्यात्मिक विचार मंच च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायातील लोकांचा जनसंपर्क वाढवला असून दैनंदिन लिखाणात सातत्याने आध्यात्मिक लेख प्रकाशित करून सर्वसामान्य अध्यात्माची गोडी लागावी या उद्देशाने सातत्याने कार्यरत आहे.
या पुरस्काराबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निलेश कोंडे- देशमुख (आळंदी देवाची), प्रदेश संघटक शरद आढाव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ह भ प मधुकर महाराज जाधव आगाशिवनगर, ब्राह्मण महासंघ विश्वस्त स्मिताताई कुलकर्णी, स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे ,मुख्य महासचिव कमलेश (देवा) शेवाळे, विश्वस्त उमेश काशीकर सोलापूर, योगेश पाटील मुंबई, भरत नजन राहुरी, सौ धनश्री ताई उत्पात पंढरपूर, हारुण भाई शेख नासिक, राज्य सदस्य सौ सविता तावरे सौ मंजुषा डोईफोडे, सौ संगीता बोराडे, योगेश दंदने, प्रशांत निकम, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले डिकसळ, प्रदेशाध्यक्ष प्रेममूर्ती अनिल अण्णा वाळके पाथर्डी, मा चेअरमन राजाबाबा होळकर, कृषीतज्ञ सचिन दादा होळकर नासिक जिल्हा अध्यक्ष ह भ प निवृत्ती महाराज रायते, उपाध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज चव्हाण, सह जिल्हाध्यक्ष रामायणाचार्य भास्कर नाना रसाळ,महंत संजयदास जी महाराज शिंदे, हभप तुकाराम महाराज पवार, कोषाध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज शिरसाठ, विठ्ठल रखुमाई ग्रुप मुख्य मार्गदर्शक भागवताचार्य शुभदाताई लोहार सांगली, भागवत कथाकार हभप विठोबा दादा आवारे,हभप विनायक महाराज वाघ,हभप दिपाली ताई घोडके पुणे ,रामायणाचार्य हभप वर्षाताई काळें बीड, रामायणाचार्य हभप मिनाताई महाराज मडके गदेवाडी शेवगाव,रामायणाचार्य हभप राम महाराज उदागे श्रीरामपूर, मुख्य संचालक शंकरराव कोल्हे नैताळे, भागवताचार्य सीमाताई राजेंद्र काळे चांदवड,सौ कांताताई इंगळे घाटकोपर,रत्नाताई चांदगुडे पाटील शिर्डी, प्राचार्य सी डी रोटे सर विंचूर, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर,गवळी एन पी सर, नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे अशोकराव पगार सर मनमाड, लक्ष्मणराव आवारे सर,सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ,सौ अर्चनाताई जामोदे खामगाव बुलढाणा, बाबुराव पाटील सानप शिवडी, भास्कर आबा मांजरे धामोरी, साहेबराव आण्णा कुयटे आहेरगाव,नाथभक्त उमेश आप्पा चव्हाण दरसवाडी, मच्छिंद्र आवारे शिंदी,सौ ललिताताई कुयटे आहेरगाव, पुंडा बापु देशमुख, श्रावण नाना आवारे शिंदी,सौ संगीताताई पाटील, सौ सुनीताताई जगताप,सौ सविता पगार, सौ रेखाताई येणारे, सौ सुवर्णा निकम ,सुरेखा धुमाळ, विद्याताई जगताप,सौ विजया डमरे, सौ पुष्पा पवार, नितीन काका चौधरी ओझर,सौ रिनाताई सोनवणे,सौ मंगलताई सासवडे, संगिताताई तावरे,सौ रमाताई आठवले शिक्रापूर पुणे, गणेश माऊली दवंगे माहेगाव देशमुख, जयाताई निचीत नैताळे, शंकरराव भवर,अरुण भाऊ घायाळ नैताळे, प्रविण ठाकरे उर्धुळ, ललिताताई पगार वागदर्डी, उत्तमराव शिंदे हरसुले आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleनाफेडणे हरभरा खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचा दाणा-दाणा त्वरित खरेदी करावा.:- अक्षय पाटील
Next articleगोंदेगाव च्या हिरकणीने अथक परिश्रमाने केले पोलीस दलात भरतीचे स्वप्न पूर्ण—
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here