• Home
 • निलेवाडी गावातील रस्त्याला १० लाखाचा निधी

निलेवाडी गावातील रस्त्याला १० लाखाचा निधी

 1.  

  कोल्हापूर : निलेवाडी ता.हातकणंगले येथील विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी आमदार राजूबाबा आवळे यांचा सत्कार करताना सुभाष भापकर. शेजारी शहाजी बोरगे , माणिक घाटगे ,प्रभाकर घाटगे ,शामराव उरूनकर संतोष जाधव, प्रकाश भोसले ,शिवाजी खोत, बाळासो सूर्यवंशी ,शंकर घाटगे ,अशोक घाटगे , आदी.
  निलेवाडी च्या विकासास निधी कमी पडू देणार नाही असे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा जयवंतराव आवळे यांनी निलेवाडी येथे सांगितले.
  राजूबाबा जयवंतराव आवळे यांच्या फंडातील विकास कामे उद्घाटन शुभारंभ व सत्कार समारंभ झाला.यावेळी ते बोलत होते.
  निलेवाडी घाटगे पाणंद रस्ता डांबरीकरण करणे या कामांचा प्रारंभ करण्यात आला.
  यावेळी येणाऱ्या निधीतून आणखी दहा लाखांचा निधी निलेवाडीस जाहीर केला तसेच निलेवाडी चिकुर्डे पूल दरम्यान मोठा पूल बांधणार असल्याचे सांगितले तसेच निलेवाडीतून जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरून निराधार जनतेचे श्रावण बाळ होणार असल्याचे सांगितले निधी दिल्याबद्दल आमदार राजू बाबा आवळे यांचा सत्कार सुभाष भापकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  यावेळी सुभाष भापकर. शेजारी शहाजी बोरगे , माणिक घाटगे ,प्रभाकर घाटगे ,शामराव उरूनकर संतोष जाधव, प्रकाश भोसले ,शिवाजी खोत, बाळासो सूर्यवंशी ,शंकर घाटगे ,अशोक घाटगे शिवाजी माने विविध संस्थांचे पदाधिकारी पदाधिकारी , ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

  युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment