Home Breaking News हायमास्टच्या प्रकाशाने अंबप गाव उजळणार

हायमास्टच्या प्रकाशाने अंबप गाव उजळणार

183

हायमास्टच्या प्रकाशाने अंबप गाव उजळणार

कोल्हापूर : अंबप ता. हातकणंगले येथील विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी आमदार राजूबाबा आवळे यांचा सत्कार करताना सोमराज पाटील. शेजारी रामभाऊ लोकरे, अँड. राजवर्धन पाटील,डॉ.बी.के.पाटील,पंडितराव लोकरे आदी.
अंबप येथे आमदार फंडातून दहा हायमास दिव्यांचे नियोजन केले असल्याने आता गाव उजळणार असल्याचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा जयवंतराव आवळे यांनी अंबप येथे सांगितले.
राजूबाबा जयवंतराव आवळे यांच्या फंडातील विविध विकास कामे उद्घाटन शुभारंभ व सत्कार समारंभ झाला.यावेळी ते बोलत होते.
आंबेडकर नगर चौक ते सुभाष कार्वेकर रस्ता डांबरीकरण, वडगाव मळा येथे रस्ता डांबरीकरण करणे, मातंग समाज वसाहतीत अंतर्गत रस्ता पेविंग ब्लॉक बसविणे, गणेश मंदिर परिसर सुशोभिकरण व कंपाऊंड भिंतीचे बांधकाम करणे, सुभाष डोंगरे अंतर्गत रस्ता पेव्हिंनग बसविणे, अनिल डोंगरे ते सागर सावन्त अंतर्गत रस्ता, पेव्हिंग ब्लॉक बसविणे ,अर्जुन वाघमोडे अंतर्गत रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमॅक्स दिवे बसवणे या कामांचा प्रारंभ करण्यात आला.
इसाक याकूब मुल्ला देशसेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते, गावाला भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार राजू बाबा आवळे यांचा सत्कार सोमराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अँड. राजवर्धन पाटील, रामकृष्ण लोकरे डॉ. बी.के. पाटील, संपतराव कांबळे, सोमराज पाटील ,पंडितराव लोकरे ,अनिल पाटील, सागर डोंगरे, लालासाहेब माने, ग्रामपंचायत सदस्य व
बापूसो यशवंत पाटील सहकार समूह चे पदाधिकारी , ग्रामस्थ उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleप्रमोद पाटील यांना आर सी एफ चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार
Next articleनिलेवाडी गावातील रस्त्याला १० लाखाचा निधी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.