• Home
  • प्रमोद पाटील यांना आर सी एफ चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार

प्रमोद पाटील यांना आर सी एफ चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार

 

 

कोल्हापूर : तळसंदे ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रमोद यशवंतराव पाटील यांना राष्ट्रीय केमिकल्स व फर्टीलायझर चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार मिळाला .आर सी एफ चे क्षेत्रीय प्रभारी वेंगुर्लेकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण झाले.
स्वागत व प्रास्ताविक संदीप सोकाशी यांनी केले भारत सरकारच्या अधिपत्याखालील आरसीएफ च्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातून दोन शेतकरी व दोन डीलर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये प्रमोद पाटील तळसंदे व अनुजा कडव भाटीवडे ता भुदरगड. डीलर मधून गणेश फर्टिलायझर्स दहिवडी सातारा  (राजेंद्र जगदाळे )वाळवा तालुका शेतकरी सहकारी भाजीपाला संघ इस्लामपूर  (पृथ्वीराज पाटील) यांची निवड झाली त्यांचा विशेष कार्यक्रमात स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन पुरस्काराचे वितरण व गौरव करण्यात आला.
यावेळी झालेल्या भाषणात क्षेत्रीय प्रभारी योगेश वेंगुर्लेकर यांनी हर्षद आरसीएफ ही भारत सरकारची कंपनी असून नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असते शेतकऱ्यांनी कंपनीच्या नवीन उपक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील यांनी आरसीएफ चेअधिकारी, भादोले येथील श्री दत्त ॲग्रो चे सचिन पाटील व माजी पोलीस पाटील हौसेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खतांचा वापर करून ऊस व भाजीपाला यांचे भरघोस उत्पादन घेतल्याचे सांगितले. यावेळी आर सी एफ चे अमित संकपाळ जी   डी पुकळे व कर्मचारी शेतकरी उपस्थित होते .आभार सोमदेव पुजारी यांनी मानले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment