Home Breaking News राजेंद्र हायस्कूलमध्ये हुतात्मा दिन उत्साहाने साजरा

राजेंद्र हायस्कूलमध्ये हुतात्मा दिन उत्साहाने साजरा

96
0

 

कोल्हापूर : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित अंबप (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा झाला. मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते.
मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्तब्धता पाळून देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहिदांना आदरांजली व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक दिलीप चरणे, पर्यवेक्षक विद्यादेवी लोहार, इंद्रजा पाटील,अनघा कानडे, सायली माने मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी सुनील कावळे, विजया पाटील, सुनंदा ठवरे, डी.आर.पाटील, मुकेश पाटील, वसंत धुदंरे, सुनील कांबळे,राजू दाभाडे आदी उपस्थित होते. दिलीप चरणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रवींद्र सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. नवनाथ शेरखाने यांनी आभार मानले. अंबप येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील. सोबत दिलीप चरणे, पर्यवेक्षक विद्यादेवी लोहार व इतर उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleआरोग्य सेवा नोकर भर्ती पुर्व प्रशिक्षण देण्यात येणार! डाक्टर आषिश देशमुख
Next articleप्रमोद पाटील यांना आर सी एफ चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here