Home गडचिरोली २० हजार रुपये बोनस देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा-खा.नेते_

२० हजार रुपये बोनस देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा-खा.नेते_

88
0

आशाताई बच्छाव

IMG_20231224_061916.jpg

२० हजार रुपये बोनस देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा-खा.नेते_

गोंदियातील डीपीसी बैठकीत सर्वप्रथम अभिनंदनाचा ठराव..

गोंदिया ,सुरज गुंडमवार- शेतकऱ्यांच्या हित जपणारे युतीतील राज्य सरकारने यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा चांगला फायदा होईल, असे डीपीसी सुरू होताच सर्व प्रथम या निर्णयासाठी राज्य सरकारचे अभिनंदन करणारा ठरावा गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला. त्याला सर्वांनी एकसुरात प्रतिसाद देत हा ठराव संमत केला.आज राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत शेतकऱ्यांच्या हिताचे केंद्र व राज्य सरकार आहे.असे मत खा.नेते यांनी व्यक्त केले.

गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री परिणय फुके, आ.अभिजित वंजारी, आ.विनोद अग्रवाल, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ.सहसराम कोरेटी, आ.विजय रहांगडाले, गोंदियाचे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी चिन्मय गोटमारे, पो.अधीक्षक निखिल पिंगळे, सीईओ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कचारगड देवस्थान आले अ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा

लाखो आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थानाला ब मधून अ श्रेणीचा दर्जा देण्याचा ठराव डीपीसी बैठकीत घेण्यात आला. याशिवाय ढासगडला क मधून ब श्रेणीत टाकण्याचा ठराव घेण्यात आला. बामणी ते धानोली रेल्वे क्रॅासिंग रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून पेंडींग आहे. परिणामी २५ किलोमीटरचा फेरा पडत आहे. त्यामुळे हे काम लवकर सुरू करावे, अशीही सूचना यावेळी खा.नेते यांनी केले.

Previous articleघोरवड येथील श्री राम मंदिरात भरला बालगोपाळांचा मेळा
Next articleम्हसदी येथील गणू महाराजांना भारतीय कौशल्य पुरस्कार,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here