• Home
  • शिवभक्त वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत

शिवभक्त वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210223-WA0064.jpg

शिवभक्त वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड :- संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चे कोरोना चे सर्व नियम पाळून अति उत्साहात साजरी होत असते वेळी कुठलेही कारण नसताना पोलीस प्रशासनाने काही शिवभक्ता वर गुन्हे दाखल केले याप्रकरणी आज मुखेड तहसील कार्यालयात शिवभक्तांच्या व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड मुखेड च्या वतीने निवेदन देण्यात आले.
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात साजरी होत होती यामध्ये कुठलीही काळीमा फासणारी घटना कोरोना चे सर्व नियम पाळत असते वेळी सुद्धा जोर शासनाने व प्रशासनाने शिवजयंती वर निर्बंध आणत. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये शिवभक्तावर गुन्हे दाखल करण्यात आले. दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेवुन शिवभक्तांची जाहीर माफी मागावी अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रभर तिवृ पडसाद उमटतील असेही निवदनाद्वारे सांगण्यात आले.
यावेळी योगेश पाटील, वैभव पाटील राजूरकर जिल्हाध्यक्ष, हर्ष पाटील बेळीकर ता. अध्यक्ष, संग्राम पाटील ता. उपाध्यक्ष, बजरंग पाटील हिवराले आदी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment