Home Breaking News 🛑 विलक्षण जीवनशिल्प दादाभाई नवरोजी यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🛑

🛑 विलक्षण जीवनशिल्प दादाभाई नवरोजी यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🛑

174
0

🛑 विलक्षण जीवनशिल्प दादाभाई नवरोजी यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ दि.४ सप्टेंबर १८२५ या दिवशी दादाभाई नवरोजी यांचा जन्म मुंबई येथे झाला.
जुन्या पिढीतील काही माणसे विलक्षण होती हे खरे आहे .आपल्या व्यक्तिगत गरजा मर्यादित ठेवून एखाद्या कार्याचा ध्यास घेऊन प्रयत्नाचे पर्वत उभे करणे हे भूतकाळात काही पुरुषोत्तमांना शक्य झाले .याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे दादाभाई नवरोजी! ९२ वर्षाचे आयुर्मान लाभलेले दादाभाई सुमारे चाळीस वर्ष विदेशात राहून देशाचे भवितव्य घडवू पाहत होते .ज्या काळात इंग्लिश लोकांनी चालवलेल्या शिक्षणसंस्थात विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळवणे देखील अवघड होते, त्याकाळात ‘गणित आणि तत्त्वज्ञान ,या विषयांचे अध्यापन करणारे पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून दादाभाईंचे नाव घेतले जाते. दादाभाई नवरोजी हे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते.
त्याकाळी राज्यकर्ते इंग्लंडमध्ये राहत होते.कायदे पार्लमेंट करीत होते. राज्य कायद्याचे होते.राज्यकारभारात जनतेचा सहभाग नव्हता. त्यात स्वारस्य वाटण्याएवढी समज लोकांना आली नव्हती. अशा स्थितीत आपण ब्रिटिश पार्लमेंटचे सभासद व्हावे, यासाठी निवडणूक लढवावी ,हा विचार दादाभाईंच्या मनात आला. सन .१८९२ मध्ये दादाभाई इंग्लंडमधल्या एका मतदारसंघातून निवडून आले. तीन वर्षे राज्यकर्त्यांच्या दरबारात आणि राजधानीत हा तत्वज्ञानाचा प्राध्यापक गणिती पद्धतीने आपले निष्कर्ष इंग्रजांच्या गळी उतरवीत होता.
दादाभाई हे पारशी समाजात जन्माला आले. तुलनेने सुविद्य आणि सुस्थितीत असा हा समाज होता. सचोटीने व्यवसाय करून दक्षतापूर्वक साहस करणारा , इंग्लिश शिक्षणाकडे सर्वप्रथम वळणारा,आधुनिकतेचा अंगीकार करून सधनतेची साधना करणारा, निर्व्यसनी, सज्जनांचा समुदाय, म्हणून हा समाज ओळखला जात असे.
दादाभाई १८५५–५६ च्या सुमारास लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले .तेथे त्यांचा ‘मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन’, ‘कौन्सिल ऑफ लिव्हरपूल’, ‘अथेनियम’, ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ इ. संस्थांशी जवळचा संबंध आला. १८६५–६६ पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. १८६५–७६ या काळात व्यवसायानिमित्त दादाभाईंच्या इंग्लंडला अनेकदा वाऱ्या झाल्या. १८६६ मध्ये त्यांनी लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली .
दादाभाईंची १८७४ मध्ये बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली. तथापि एका वर्षातच महाराज आणि रेसिडेंट यांच्याशी उद्‌भवलेल्या मतभेदांमुळे त्यांनी दिवाणपदाचा राजीनामा दिला. जुलै १८७५ मध्ये ते मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिकेच्या शहरपरिषदेवरही निवडून आले. दादाभाईंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना तीन वेळा (१८८६, १८९३, १९०६) लाभला. १९०२ साली दादाभाई लंडनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यास्तव संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत.
१९०६ च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर ‘स्वराज्य’ हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले होते.
परदेशी प्रवासाचा दादाभाईंच्या व्यक्तीमत्त्वावर व चारित्र्यावर सखोल परिणाम झाला. स्वतः उदारमतवादी पश्चिमी शिक्षण घेतल्यामुळे, दादाभाईंना त्या शिक्षणपद्धतीबद्दल आदर होता. ब्रिटिशांनी पाश्चिमात्य शिक्षणपद्धती भारतात आणून तिचा प्रसार केल्याबद्दल भारताने नेहमीच इंग्लंडशी कृतज्ञ राहिले पाहिजे, अशी दादाभाईंची भावना होती. आपल्या खाजगी जीवनामध्ये दादाभाईंचे वर्तन साधे परंतु भारदस्त होते.

एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीपुरुष-समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या. दादाभाईंच्या ह्या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेट यांसारख्यांनी मोठा हातभार लावला.

दादाभाई नवरोजी हे भारतीय राज्याशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे जनकच मानले जातात. परकीयांच्या वर्चस्वाखालील भारतातील आर्थिक घटनांच्या विशदीकरणाची किती नितांत आवश्यकता आहे, ते दादाभाईंनी आपल्यानंतरच्या अर्थशास्त्रज्ञांना दाखवून दिले.

पश्चिमात्य शिक्षण, जगप्रवास, विलायतेतील वास्तव्य, वर्षानुवर्षे केलेला यज्ञ, देशबांधवांच्या वतीने, आणि निर्भयतेने केलेले मार्गदर्शन, सामाजिक संस्थांची बांधणी आणि उभारणी या साऱ्या त्यांच्या गुणसंपदाकडे पाहून इतिहासाने नतमस्तक व्हावे आणि दिव्यत्वाची जेथे प्रचिती असे म्हणत कर जोडावेत असे हे विलक्षण जीवन शिल्प होते.
🙏अशा या विलक्षण जीवनशिल्पाला जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏 ⭕

Previous article🛑 मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर खास लक्ष : डॉ. दीपक म्हैसेकरांना नेमले सल्लागार 🛑
Next article🛑 Yulu E-Bike ची राईड घ्यायचीय ? जाणून घेऊयात प्रकल्प 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here