• Home
  • 🛑 मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर खास लक्ष : डॉ. दीपक म्हैसेकरांना नेमले सल्लागार 🛑

🛑 मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर खास लक्ष : डॉ. दीपक म्हैसेकरांना नेमले सल्लागार 🛑

🛑 मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर खास लक्ष : डॉ. दीपक म्हैसेकरांना नेमले सल्लागार 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार म्हणून निवृत्त सनदी आधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. म्हैसेकर यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. नुकतेच ते निवृत्त झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम करणारे असले तरी त्यांचे कार्यालय पुण्यात राहणार आहे.

राज्य सरकारने आज या निर्णयाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्या नियंत्रणाखाली डॉ. म्हैसेकर काम करणार आहेत. पुण्यात विभागीय आयुक्त म्हणून काम केले असल्याने सध्याच्या कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे. कोणत्याही विषयावर परिस्थितीचे विश्‍लेषण करून मुख्यमंत्री ठाकरे यांना योग्य तो सल्ला देण्याची जबाबदारी डॉ. म्हैसेकर यांच्यावर राहणार आहे.

मुंबईत सीएमओ कार्यालयामार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणाबाहेर जात आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉ. म्हैसेकर यांच्या अनुभवाचा फायदा पुण्याला होण्याची शक्‍यता आहे.

पुण्यात महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय, आरोग्य खाते या सर्वांशी समन्वय साधण्याचे प्रमुख काम म्हैसेकर यांना करावे लागणार आहे. या यंत्रणात समन्वय नसल्याने पुण्यात सुमारे 80 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील कारभाराचा गोंधळ पुढे आला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर मोठी टीका होत आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील सारे निर्णय घेत असले तरी दीपक म्हैसेकर हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून त्यांचेही निरोप पोहोचविण्याचे काम करतील. पुण्यातील लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद होते, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत काल (गुरूवारी) सांगितले होते. त्यानंतर लगेच म्हैसेकर यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला.

या कामासाठी त्यांना पुणे येथे आरोग्य विभाग किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकारा महामंडळ हे कार्यालय उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment