Home कोल्हापूर चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून 

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून 

132
0

राजेंद्र पाटील राऊत

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून

(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची घटना जयसिंगपूरजवळ धरणगुत्ती ता.शिरोळ येथे घडली. अर्चना चेतन घोरपडे (वय २५, रा. जयप्रकाश हौसिंग सोसायटी) असे तिचे नाव आहे. खुनानंतर पती चेतन मनोहर घोरपडे (वय ३०) याने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सकाळी अकराच्यासुमारास घडली. याबाबतची तक्रार वासंती प्रकाश पुजारी (रा. विजयसिंहनगर, शिरोळ) यांनी पोलिसांत दिली.
पोलिसांनी सांगितले की, मूळची शिरोळ येथील असलेली अर्चना हिचा जयसिंगपूर येथील चेतन घोरपडे याच्याशी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.
शिरोळ : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची घटना जयसिंगपूरजवळील धरणगुत्ती येथे घडली. अर्चना चेतन घोरपडे (वय २५, रा. जयप्रकाश हौसिंग सोसायटी) असे तिचे नाव आहे. खुनानंतर पती चेतन मनोहर घोरपडे (वय ३०) याने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सकाळी अकराच्यासुमारास घडली. याबाबतची तक्रार वासंती प्रकाश पुजारी (रा. विजयसिंहनगर, शिरोळ) यांनी पोलिसांत दिली.
पोलिसांनी सांगितले की, मूळची शिरोळ येथील असलेली अर्चना हिचा जयसिंगपूर येथील चेतन घोरपडे याच्याशी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.
तीन वर्षांपासून दोघेजण जयप्रकाश हौसिंग सोसायटी येथील श्रीकांत जाधव यांच्या घरी भाड्याने राहत होते. गेल्या दोन महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. या वादातूनच अर्चना दहा दिवसांपूर्वी शिरोळला माहेरी गेली होती. शनिवारी सकाळी औद्योगिक वसाहतीत कामावर ती गेली होती. तिला चेतन आपल्या घरी घेऊन गेला होता. मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळला. त्यानंतर ब्लेडने हाताची नस कापून गळ्यावरदेखील वार केल्यामुळे अर्चना जागीच ठार झाली. संशयित चेतन हा काकासोबत जयसिंगपूर पोलिसांत आल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. त्यानंतर शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. संशयित चेतन याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleइचलकरंजी नागरिक मंचला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त,कार्यकारिणी जाहीर.
Next article.शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा, प्रा.डॅा.माने
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here