• Home
  • इचलकरंजी नागरिक मंचला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त,कार्यकारिणी जाहीर.

इचलकरंजी नागरिक मंचला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त,कार्यकारिणी जाहीर. 

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील नागरी समस्या सोडविण्याच्या व जागरूक नागरिक तयार करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या इचलकरंजी नागरिक मंच या संस्थेस नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले असुन संघटनेची कार्यकारिणी जाहीर झाली आहे.
संघटनेच्या अध्यक्षपदी अभिजित पटवा,उपाध्यक्षपदी उमेश पाटील,सेक्रेटरी सुहास पाटील तर खजिनदारपदी अमितकुमार बियाणी यांची निवड झाली आहे.कार्यकारिणी सदस्यपदी दयानंद लिपारे, प्रसाद कुलकर्णी,अरुण बांगड,राजु कोंनूर,राजुदादा आरगे,शितल मगदुम,उदयसिंह निंबाळकर,विद्यासागर चराटे,आप्पासाहेब पाटील,अमोल ढवळे यांचा समावेश आहे.
नागरी समस्या सोडविण्यासाठी कायदेशीर मार्गाने वेळ पडल्यास आंदोलनाने प्रशासनास भाग पाडणे हा संस्थेच्या उद्देशाचा भाग असून लवकरच सभासद नोंदणी तसेच प्रभागनिहाय कार्यकारिणी करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment