Home गडचिरोली सुरजागड येथील होणारे लोहखनिजाचे अतिरिक्त उत्खनन व ओव्हरलोड वाहतुक शिवसेना रोखणार.

सुरजागड येथील होणारे लोहखनिजाचे अतिरिक्त उत्खनन व ओव्हरलोड वाहतुक शिवसेना रोखणार.

196
0

आशाताई बच्छाव

IMG-20220529-WA0000.jpg

सुरजागड येथील होणारे लोहखनिजाचे अतिरिक्त उत्खनन व ओव्हरलोड वाहतुक शिवसेना रोखणार.                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
दिनांक 28 मे 2022 रोज शनिवारला गडचिरोली जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भामरागड येथे सुरू असलेल्या माडीया मोहत्सवास उपस्थित होणार होते,त्यानिमित्य आरमोरी विधानसभेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल हे आपल्या प्रमुख पदाधिकार्यासोबत भामरागड च्या दौऱ्यावर असताना,आलापल्ली येथील विश्रामगृहात अहेरी विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱयांसोबत बैठक पार पडली,त्यात पदाधिकाऱयांनी लोहखनिज उत्खनन करणारी कंपनी कशाप्रकारे सामान्य जनता व आदिवासीवर अन्याय,अत्याचार करत आहे याचा पाढाच वाचून दाखवीला, त्या लोहखणीज कंपनीने उत्खननाच्या नावाखाली शासन,प्रशासनाची लक्तरं वेशीवर टांगलेली दिसली.
प्रमुख मुद्दा हा आहे की अजूनही या प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात स्थानिक युवकांना रोजगार मिळालेला नसून,काही दलालांनी या कंपनीला वेढा घातलेला आहे.
रोज फक्त 2000 टन लोहखणीज उत्खनन करण्याची परवानगी असताना इथून मात्र रोज जवळपास 20000 हजार टनाच्या वर उत्खनन केले जात आहे,ट्रक मध्ये सुद्धा 75,ते 80 टनाच्या वर लोहखणीज भरून ओव्हरलोड वाहतूक केल्या जात आहे,त्यामुळे मुख्य मार्ग संपूर्ण खराब झाला असून मोठमोठे गडडे पडलेले आहेत,विशेष बाब म्हणजे बरेच ट्रक हे बिना टीपी ने वाहतुक करीत आहेत,ज्या रोड नी वाहतूक व्हायला पाहिजे तो रोड सोडून भलत्याच रोड नी बिनबोभाट वाहतूक सुरू आहे.
रोज या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेक अपघात होत असुन बरीचशी प्रकरणे ही दाबली जात असून लोहखनिज कंपनीची मनमानी,हितलरशाही सुरू आहे,रात्री परवानगी नसतानाही लोहखनिजाचे अवैधरीत्या उत्खनन व शेकडो ट्रकणी ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे याकडे मात्र प्रशासन जाणूनबुजून डोळेझाक करत आहे.
आलापल्ली जवळ मंदिमाडगू जवळ कंपनी तर्फे रस्ता बनविण्यात येत असून तेथे जगलातीलच मुरुमाचे हजारो टन उत्खनन होत आहे,विशेष म्हणजे मुरुमाच्या उत्खननावर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असुन सुरजागड कपणीलाच जगलातीलच मुरूम काढण्याची परवानगी मिळाली का, मोठमोठ्या झाडांची कत्तल होत असून या सर्व बाबीकडे तेथील DFO नी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलेले आहे,
स्थानीक नागरिकांनी सांगितले की सुरजागड कंपनीच्या विरोधात काहीही तक्रार केली तर त्याला केराची टोपली दाखवल्या जाते,प्रशासनातील काही अधिकारी हे कंपनीच्या अगदी जवळ आहेत.
सरकारने सुरजागड लोहप्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी,व संपूर्ण जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशाने सुरू केलेला असून कंपनीने जर या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला तर शिवसेना या विरोधात जनआंदोलन करेल,ओव्हरलोड वाहतुकीला अटकाव करेल,अवैध उत्खनन थाबवेल असा इशारा आरमोरी विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल,अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाझभाई शेख यांनी दिला आहे.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचेसह अहेरी जिल्हाप्रमुख रियाझभाई शेख,उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,युवासेना अहेरी जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर डोंगरे,सामाजीक कार्यकर्ते संतोष अग्रवाल,मनीष दुर्गे तालुकाप्रमुख एटापल्ली,रोशन गोडसेलवार,वडसा ताप्रमुख नांदुभाऊ चावला,प्रशांत किलनाके सरपंच, विकास प्रधान शहर प्रमुख वडसा,व परिसरातील शिवसैनिक हजर होते.

Previous articleस्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या विचारधारेतूनच जीवनाची सार्थकता… !
Next articleगोंदिया जिल्ह्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती. मा.श्री.नितीनजी गडकरी केंद्रीयमंत्री, रस्ते वाहतूक,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here