• Home
  • रेल्वे पाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार! २५ मे तारीख ठरवली.

रेल्वे पाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार! २५ मे तारीख ठरवली.

  • ⭕ रेल्वे पाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार!
    २५ मे तारीख ठरवली. ⭕
    ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

    भारतीय रेल्वेने १ जूनपासून मर्यादित प्रमाणात का होईना, पण रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत नागरी उड्डाण मंत्रालयाने देखील विमान वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या २५ मे पासून म्हणजे अवघ्या ५ दिवसांमध्ये देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली आहे. ट्वीट करून त्यांनी हे जाहीर केलं आहे. ‘देशांतर्गत विमान वाहतूक येत्या सोमवारी २५ मे पासून सुरू होणार असून त्यासंदर्भात सर्व विमान कंपन्यांना कळवण्यात आलं आहे. विमान वाहतुकीदरम्यान प्रवाशांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, यासंदर्भातले मार्गदर्शक नियम देखील जारी करण्यात येतील’, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
    दरम्यान, किती विमानं सुरू होतील, किती प्रवाशांना परवानगी असेल, यासंदर्भात या ट्वीटमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.

anews Banner

Leave A Comment