Home गडचिरोली बोरी येथील नविन मोहरम दर्गा इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न..!! माजी जिल्हा परिषद...

बोरी येथील नविन मोहरम दर्गा इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..!!

145

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0032.jpg

बोरी येथील नविन मोहरम दर्गा इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न..!!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..!!                                             गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी तालुक्यातील बोरी येथील नविन मोहरम दर्गा इमारतीचे लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.बोरी येथील मोहरम दर्गाची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने नविन दर्गाचे बांधकाम लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आले सदर मोहरम दर्गा बांधकामाकरिता मोहरम समितीकडे स्वतची जमिन उपलब्ध नव्हते मात्र या बांधकामास शेख परिवार यांनी आपल्या स्वमालकीची जमिन दान देऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे.बोरी येथील मोहरम हा सण सर्वधर्मीयांकडून मोठया उत्साहात साजरा केला जातो. बोरी येथील मोहरम सणामध्ये महाराष्ट्रासह, तेलंगणा,आंध्रप्रदेश या राज्यातील प्रत्येक जाती धर्माचे नागरीक एकत्रीत येऊन हा सण थाटामाटात साजरा केला जातो. विशेष म्हणजे बोरी येथील मोहरम हा सण ब्रिटिश काळापासून चालत आहे तीच परंपरा आजही सुध्दा बोरी वासीयांनी कायम ठेवली आहे. मोहरम दर्गा नविन इमारतीचे बांधकाम सुरू व्हावे यासाठी मोहरम भाविकांनी देणगीच्या स्वरूपात सहकार्य करून नविन मोहरम दर्गा उभारला आहे व या नविन मोहरम दर्गा चे लोकार्पण सोहळा दी.२९ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाले..!!

यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व मोहरम दर्गाचे प्रतिष्ठित नागरिक श्री नारायण तलांडे, श्री बरीकराव तलांडे,श्री चंद्रू तलांडे श्री गोपाळा निकेसर श्री साईनाथ बोमकंटीवार यांच्यासह श्री प्रकाश कोलपाकवार, श्री अरुण कोलपाकवार,श्री मधुकर वेलादी,पांडुरंग रामटेके,सुरेश गंगाधरीवार,सुनील कोलपाकवार, सतीश कोलपाकवार, साईनाथ कोलपाकवार,जयंत बोमकंटीवार,संतोष बोमकंटीवार, अखिल गजाडीवार, विनोद ओल्लालवार,अमोल कोलपाकवार,आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन मोहरम समिती अहेरी चे तालुका उपाध्यक्ष अखिल कोलपाकवार यांनी केले तर आभार मोहरम समितीचे सदस्य कविराज मोहुर्ले यांनी मानले या कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी बोरी येथील मोहरम दर्गा चे सदस्य साई तलांडे, साईनाथ मडावी, दौलत मडावी,साईनाथ सोनटक्के, संतोष तलांडे, हरीचंद्र नीकेसर, ज्ञानेश्वर गड्डमवार, गोपाळा चांदेकर, अविनाश सोनटक्के, मुमताज शेख, सुभाष गंगूवार,लक्ष्मण आत्राम, शंकर गोरेडीवार,बाबुराव दुर्गे, विलास जंपलवार, मारोती सांगोजवार, आदींनी सहकार्य केले..!!

Previous articleवायसीएम’ रुग्णालयाच्या पाचव्या मजल्याला भीषण आग
Next articleजिल्हा काँग्रेसच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी करिता उमेदवार चाचपणी ला सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.