Home जालना राजकीय श्रेयवादात रखडून पडलेल्या जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास अखेर राज्य शासनाची मान्यता

राजकीय श्रेयवादात रखडून पडलेल्या जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास अखेर राज्य शासनाची मान्यता

162

आशाताई बच्छाव

IMG-20230627-WA0045.jpg

राजकीय श्रेयवादात रखडून पडलेल्या जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास अखेर राज्य शासनाची मान्यता
—————————————-
आ.कैलास गोरंटयाल संघर्षमय प्रयत्नांना अखेर यश
—————————————-
जालना(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयास अखेर राज्य शासनाने आज बुधवारी आर्थिक तरतुदीसह मान्यता दिली आहे.जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी या मागणीसाठी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळाल्याने जालना शहरासह जिल्ह्यातील जनतेकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे अशी आग्रही मागणी आ.कैलास गोरंटयाल यांनी सातत्याने शासन स्तरावर केली आहे.या मागणीची दखल घेऊन राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार मधील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी तज्ञ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जालना येथे पाठवले होते.या पथकातील अधिकाऱ्यांनी काही जागांची पाहणी करून तसा अहवाल सादर केला होता.महत्वाची बाब म्हणजे त्यानंतर स्वतः अमित देशमुख यांनीही जालना येथे येऊन प्रस्तावित जागेची पाहणी करून वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुरी देण्याचा प्रस्ताव पाठवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महाविद्यालयास मान्यता दिली होती.मात्र,राज्यात सत्तांतर होऊन शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर जालना येथील मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कोणतीच आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती.त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध आ.कैलास गोरंटयाल यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पायऱ्यांवर बसून लक्षवेधी धरणे  आंदोलन करत या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.

Previous articleशंकरराव आगळे यांचे निधन
Next articleभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जिल्हाप्रमुख सुभाष दांडेकर यांच्याकडून निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.