Home गडचिरोली गुरवळा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार , एक जखमी

गुरवळा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार , एक जखमी

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0017.jpg

गुरवळा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार , एक जखमी

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-

गडचिरोली: गडचिरोली पासून अवघ्या ४ किमी अंतरावरील गुरवळा रोडवर विहिरगाव फाट्यानजीक अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना आज घडली.
दुचाकी स्वार हा गडचिरोली वरून परत आपल्या गावी जात असताना ही घटना झाली, चार चाकी अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला ,मृत पावलेल्या इसमाचे नाव राजू कवडू बोदलकर( वय ५०) रा.( राखी )गुरवळा , तर जखमी इसमाचे नाव भीमराव नगराळे रा, (राखी) गुरवळा त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले . पोलीस घटनास्थळावर पोहचून घटनेचा पंचनामा करून मृत झालेल्याचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे .
झालेल्या घटनेने मृतकाच्या घरी शोक पसरला आहे .
अज्ञात वाहना विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशन ला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .

Previous articleवैधव्य (विधवा) एक शोध आणि बोध…!!
Next articleरिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here