Home सामाजिक वैधव्य (विधवा) एक शोध आणि बोध…!!

वैधव्य (विधवा) एक शोध आणि बोध…!!

90
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220617-061718_Google.jpg

वैधव्य (विधवा) एक शोध
आणि बोध…!!
✍️ राजेंद्र पाटील राऊत
वाचकहो,
आज थोडं आगळं वेगळं पण मर्मभेदक लिहावंस वाटलं.म्हणून हा लेखनप्रपंच!आपला भारतीय समाज हा पुरातन मतवादी व वाहयात फालतुच्या परंपरा जपणारा समाज आहे,असे आता प्रकर्षाने वाटायला लागले आहे.वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीला विधवा,गतधवा,गंगाभागिरथी,श्रीमती वगैरे शब्द वापरले जातात.आणि अशा या स्त्रीला कुठल्याही देवपुजेत अथवा समाजात शुभकार्यात मानसन्मान नसतो ही खेदाची बाब म्हटली पाहिजे.अशा कोणत्या देवाने सांगितले आहे की,स्त्री विधवा झाली म्हणजे तिचे सगळे अस्तित्वच संपले.त्याला कुठलाही आधार नाही.आणि समजा एखाद्या पुरुषाच्या अगोदर त्याची बायकोच मेली तर मग अशा पुरुषाला हा समाज कोणत्या नाकाने स्विकारतो.त्याला मानसन्मान,चारचौघात शुभकार्यात बिनधास्त प्रवेश.मग हा असा भेदभाव कशासाठी?म्हणजे लहानपणापासूनच स्त्रीने अन्याय अत्याचार व फालतुच्या रुढी परंपराना बळी पडायचे का?त्याग फक्त तिने एकटीनेच करायचा का?हा सगळा बामणी कुटील कारनामा आहे.हे बहुजन समाजाने हे ओळखले पाहिजे.वास्तविक कुठल्याही स्त्रीचा ऐन तारुण्यात पती वारला तर वासनांधतेने बरबटलेला समाज आणि त्यात टपून बसलेले डोमकावळे त्या एकटया दुकटया एकाएकी पडलेल्या स्त्रीकडे वासनांध नजरेने बघतात.मग हा दोष तिचा कसा? नवरा मेला म्हणून तिचे स्वतः चे जगण्याचे स्वातंत्र्य पण हिरावून घेतले का?हे कुठल्या धर्मग्रंथात लिहलेले आहे.तसे बघितले तर मी सुध्दा हिंदू धर्मातच पैदा झालो आहे आणि धर्माचे बहुतांशी ग्रंथही वाचले आहेत.पण…वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीबाबत मी हे सगळ पोटतिडकीने का लिहत आहे तर मी सुध्दा एका विधवा महिलेचा मुलगा म्हणूनच माझे आयुष्य काढलेले आहे.दुर्दैवाची बाब अशी की,माझी आई ज्यावेळी विधवा झाली त्यावेळी मी अवघा दिड वर्षाचा होतो.मीच जर सतरा अठरा वर्षाचा राहिलो असतो,तर मी नक्कीच माझ्या हाताने आईचा विवाह चांगल्या ठिकाणी करुन दिला असता हे माझे पुरोगामी विचार आहेत.कुठलीही स्त्री विधवा झाली म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीवर बंधन आणले जातात म्हणजे ती नरकयातना भोगणार तिचे अस्तित्व नष्ट करण्याचा हा कुटील बामणी कावा आजपर्यंत कुणीच ओळखू शकले नाही,हीच मोठी शोकांतिका आहे.नवरा ऐन तारुण्यात मेला मग त्या स्त्रीच्या भावनांचे स्वप्नांचे इच्छा अपेक्षाचे काय?फक्त समाजाचे नियम पाळण्यासाठी तिने लाचारासारखे आपले जीवन जगायचे का? म्हणजे हा निव्वळ थोतांडपणा आहे.महर्षी धोंडो केशव कर्व,महात्मा ज्योतीबा फुलेंसारख्या महापुरुषांनी या विधवा स्त्रीबाबत असलेल्या अनिष्ट रुढी परंपरा नष्ट करण्यासाठी आपले बहुमुल्य योगदान दिल्याचा इतिहास आहे.तरीही विधवा रुढी परंपरा आजही हा समाज जपतो तेव्हा अक्षरशः लाज वाटते व चीड येते.की,काय अधिकार आहे आम्हांला स्वतः ला सुशिक्षित व शिक्षित म्हणवून घेण्याचा? विधवांना देखील मान सन्मानाचे जीवन जगू द्या…शुभकार्यात त्यांचाही आत्मसन्मान वाढवा! परंतु या विज्ञानवादी व एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर आम्ही पाऊल ठेवले तरी ग्रामीण भागात वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीचे सकाळी सकाळी तोंड पाहणे अशूभ मानले जाते.ही स्त्रीच्या अस्तित्वाला बदनाम करणारी प्रथा व परंपरा काय कामाची? हे सगळे भट बामणानी पोट पाण्याची रोजीरोटीसाठी बनविलेले कारस्थान आहे.मला तरी असा अनुभव आहे की,मी माझ्या बालपणापासून तर आता आतापर्यंत विधवा स्त्रीचे (अर्थातच माझ्या आईचे मुखकमल बघून) येवढी प्रगती केलेली आहे.त्याशिवाय युवा मराठा न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक यांना देखील ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झाले.पण…आजवर त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही प्रगतीकडे वाटचाल करीत आहोत.त्यामुळेच आता तरी समाजाने आपली दृष्टी व दृष्टिकोन बदलला पाहिजे.व विधवांनाही मानसन्मानाचे जगणे त्यांच्या जीवनात निर्माण व्हावे ही काळाची गरज आहे.त्याशिवाय सध्याचा काळ तर प्रचंड भयानक व परिस्थितीने बिघडत चाललेला आहे,मुलांना लग्नासाठी बायकाच मिळत नसल्यामुळे आज बहुतेक ठिकाणी विधवा मुलीशीही बिन लग्नाचे मुल लग्न करताना दिसून येत आहेत.ही निश्चितच समाधानाची व योग्य दिशेने जात असलेली पाऊल आहेत.खर तर हिच काळाची गरज आहे.मी ग्रामीण भागात सतत भटकंतीवर असतो तर अनेकदा असेही बघायला मिळते की,नवरा मरुन पुरते वर्षही झालेले नसते तर अशाही काही ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झालेल्या एक एक दोन दोन मुलांच्या आईदेखील तरुण मुलाशी विवाहबध्द होऊन सन्मानाचे जीवन जगत आहेत.मग हा भेदभाव इतर विधवा स्त्रीच्या बाबतीत वेगळा का असतो.की,तिने देवकार्यात शुभकार्यात सहभागी होऊ नये.किंवा समाज काय म्हणेल?ही भिती फक्त अशा स्त्रीलाच का लागू होते?याचेही खरे तर आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे.वास्तविक यापुढे मी तरी माझ्या संस्थेच्या माध्यमातून विधवा स्त्रीयांच्या प्रश्नावर निश्चितच लढा उभारुन मोठे बंड करेन हे नक्कीच!

Previous articleपी .आर .पोटे पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना जनावराच्या लसीकरनासंदर्भात केले मार्गदर्शन
Next articleगुरवळा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार , एक जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here