Home नांदेड लोह्यात अजित पवार यांच्या निवडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून जल्लोष

लोह्यात अजित पवार यांच्या निवडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून जल्लोष

182
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0109.jpg

लोह्यात अजित पवार यांच्या निवडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून जल्लोष

अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधि
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रमुख नेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षासोबत युती केली. त्यांची राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल लोहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नांदेड ग्रामीणचे जिल्हा सचिव विलास पाटील घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून तसेच मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मागील कांहीं कालावधी पासून राज्यात विविध राजकीय घटना घडामोडी घडून आल्या. रविवारी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक प्रमुख आमदार राज्यातील सत्ताधारी पक्षात (युती) धर्म पळून सहभागी झाले. त्यांना सत्ताधारी पक्षाकडून मंत्री पद देण्यात आले. त्यामध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. तर इतर आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल नांदेड ग्रामीणचे जिल्हा सचिव विलास पाटील घोरबांड यांनी समर्थक मंडळींसह आनंदोत्सव साजरा केला व त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्राच्या राजकारणामुळे सामान्यांना वैताग
Next articleनाशिकमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here