Home नाशिक नाशिकमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

नाशिकमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0106.jpg

नाशिकमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी नाशिक,( अँड नयना नागरे)-2015 मध्ये स्थापन झालेल्या रायगड चौक सिडको येथील प्रतिष्ठित रेनबो किड्स स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.. छोट्या छोट्या बाळ गोपाळ यांनी वारकरी वेश परिधान केला होता तर मुलींनी नऊवारी साडी परिधान केली होती. दिंडी शाळेपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत नेण्यात आली यात मुलांचा तसेच पालकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. ज्युनिअर केजी मधील कुमार अद्वैत नागरे यांनी विठ्ठलाचे अत्यंत सुंदर रूप साकारले. रेनबो किड्स मधील सर्व मुला मुलींनी विठू माऊलीच्या विविध गाण्यांवर
नृत्य देखील केले. रेनबो किड्स स्कूलच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापिका सौ.जयश्री वाघ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.तसेच कार्यक्रम नियोजनबद्ध व उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी योगिता टीचर प्राजक्ता टीचर तसेच नलिनी टीचर व इतर स्टाफ ने खूप मेहनत घेतली. चांगला पाऊस पडून आमच्या शेतकरी राजाला समृद्धी मिळावी असे साकडे विठू माऊली कडे करण्यात आले.

Previous articleलोह्यात अजित पवार यांच्या निवडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून जल्लोष
Next articleसिकलसेल रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here