Home गडचिरोली सिकलसेल रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे...

सिकलसेल रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन

139

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0106.jpg

सिकलसेल रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा

भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन

गडचिरोली येथे सिकलसेल निर्मुलन अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) :- 
सिकलसेल रुग्णासाठी शासनाने मोफत औषधोपचार देण्याचा निर्णय घेतला असून सिकलसेल रुग्णांना उपचार करण्याकरिता सिकलसेल कार्डाचे वाटप करण्यात येत आहे तसेच सिकलसेल रुग्णांना रुग्णालयातील सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहे तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशा सर्व रुग्णांची नोंद प्रधानमंत्री आयुष्यमान जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड मध्ये करण्यात येणार असून त्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी सर्व सिकलसेल रुग्णांनी मोफत औषधोपचार योजनेचा लाभ घ्यावा व नागरिकांनीही न घाबरता सिकलसेल ची तपासणी करून घ्यावी असे आवाहन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केले. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात सिकलसेल निर्मुलन अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते मध्यप्रदेश मधील शहाडोल जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याच धर्तीवर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ व सिकलसेल रुग्णांना उपचार करण्यासाठी कार्ड वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, हेमंत जंबेवार, कविता उरकुडे, ज्योती बागडे,अनिता मडावी, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ बागराज धुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील मडावी, डॉ माधुरी किलनाके,डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ पंकज हेमके, डॉ दीक्षांत मेश्राम, डॉ चकोर रोकडे,डॉ मुकुंद डबाले उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सतीश सोळंखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड व सिकलसेल रुग्णांना उपचार करण्यासाठी कार्डचे वाटप करण्यात आले. संचालन प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय ठाकरे यांनी केले. आभार डॉ धुर्वे यांनी मानले.

Previous articleनाशिकमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
Next articleदिवसेंदिवस रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा.असे निर्देश खासदार अशोकजी नेते यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.