Home गडचिरोली दिवसेंदिवस रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा.असे निर्देश खासदार अशोकजी नेते...

दिवसेंदिवस रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा.असे निर्देश खासदार अशोकजी नेते यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले.

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0054.jpg

दिवसेंदिवस रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा.असे निर्देश खासदार अशोकजी नेते यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले.
—––—————–—————-
रस्ता सुरक्षा समितीची बैठक मा.खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे संपन्न झाली.

गोंदिया/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):-जिल्हातील रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पार पडली. सर्व प्रथम रस्ता सुरक्षा समितीची बैठक सुरू होण्याअगोदर खासदार सुनिल जी मेंढे साहेब व जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे तसेच बैठकीत उपस्थिती सहभागी यांनी मा.खासदार अशोकजी नेते यांना वाढदिवसाच्या निमित्याने उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देत बैठक सुरू करण्यात आली.

या बैठकीत खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षतेखाली बोलतांना रस्ता सुरक्षेसंबधित काम करणारे महत्वाची भुमिका (आरटीओ) परिवहन अधिकारी व पोलीस विभाग हे दोन विभाग यामध्ये अतिशय महत्त्वाचे काम करतात.रस्ता सुरक्षेत विविध कारणांमुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मानवाचा जीव अत्यंत मोलाचा असून रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता सर्व संबंधित विभाग रस्ते सुरक्षा संबंधित घटकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे निर्देश खासदार अशोकजी नेते यांनी दिले.

तसेच याप्रसंगी रस्ते अपघाताचा आढावा,रस्त्यांवर दिशादर्शक/माहितीदर्शक फलक लावणे, गतिरोधक( स्पिडब्रेकर),रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे, रस्त्यांवरील अतिक्रमणे,रस्ता सुरक्षा जनजागृती, अशा विविध विषयांवर चर्चा करू काय उपाययोजना केल्या जाईल यावर सविस्तर चर्चा झाली.

यामध्ये अपघात होण्यामध्ये ओव्हर स्पीडमध्ये गाडी चालविणे,ट्रिबल सीट, हेल्मेट न वापरणे, रॉंग साईड गाडी चालविणे, (मद्यपी) दारु पिऊन गाडी चालविणे,गाडी चालवतांना मोबाईल वापर करणे,रस्त्यांवर जनावरे असणे,लहान मुले गाडी चालविणे त्यांचा नियत्रंण नसणे, अशा विविध माध्यमातून अपघात होतात यावर उपाययोजना करून कार्यवाही करण्यात यावी.असे ही निर्देश यावेळी दिले.

याप्रसंगी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, खासदार सुनिल जी मेंढे, जि.प‌.अध्यक्ष पंकज रहांगडाले,जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,पोलीस अधिक्षक निखिल पिंपळे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,जिल्हा परिवहन अधिकारी राजेश करपे,आमदार विनोद अग्रवाल, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणविर,भाजपाचे जेष्ठ नेते झामसिंग जी येरणे,गजेंद्र फुंडे,परसराम फुंडे,आदित्य शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleसिकलसेल रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन
Next articleनाराज अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदाची 3 री वेळ..! विरोधकांना संभ्रम ही तर पवारांची खेळी..?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here